नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे बनावट व्हिडीओ करून सोशल मिडीयावर अपप्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 13:27 IST2019-10-10T11:31:07+5:302019-10-21T13:27:26+5:30
नाशिक- नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह व्हीडीओ मॅसेज आणि पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल करणाऱ्यांच्या विरोधात येथील पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे बनावट व्हिडीओ करून सोशल मिडीयावर अपप्रचार
नाशिक- नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह व्हीडीओ मॅसेज आणि पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल करणाऱ्यांच्या विरोधात येथील पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
यासंदर्भात पंचवटी येथील कार्यकर्ते आणि भाजयुमोचे सरचिटणीस तुषार जगताप यांनी पोलीसात तक्रार केली आहे. राज्यत विधान सभा निवडणूका होत असून आदर्श आचारसंहिता सुरू आहे. मात्र आचारसंहितेला छेद देणारे प्रकार समाजकंटकांपासून सुरू आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर गिरीश महाजन यांच्या जुन्या व्हीडीओचे एडीटींग करून ते व्हॉटस अॅप, फेसबुकवर टाकले जात आहेत. अशाप्रकारच्या जातीवाचक पोस्ट आणि व्हीडीओमुळे सामाजिक वातावरण कलुषीत होत आहेत, त्यामुळे संबंधीतांचा शोध घेऊन कारवाई करावी तसेच कायद्यानुसार ज्या वॉॅटस अॅप गु्रपवर अशाप्रकारचे व्हीडीओ व्हायरल होत आहेत, त्यांच्या ग्रुप अॅडमीनवर देखील कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील तक्रारकर्त्याने केली आहे.