Nashik Municipal Corporation Election : २२ माजी नगरसेवकांना मोठा धक्का; भाजपने कापली तिकिटे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:58 IST2025-12-31T13:57:11+5:302025-12-31T13:58:46+5:30
Nashik Municipal Corporation Election : महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देताना उलटफेरहोणार, काही नगरसेवकांना पुन्हा उमेदवार मिळत नाही हे ज्ञात असले तरी भाजपने तब्बल २२ माजी नगरसेवकांची उमेदवारी कापून धक्का दिला आहे.

Nashik Municipal Corporation Election : २२ माजी नगरसेवकांना मोठा धक्का; भाजपने कापली तिकिटे
नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देताना उलटफेरहोणार, काही नगरसेवकांना पुन्हा उमेदवार मिळत नाही हे ज्ञात असले तरी भाजपने तब्बल २२ माजी नगरसेवकांची उमेदवारी कापून धक्का दिला आहे. यात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मनसेतून अलीकडेच भाजपत आलेले माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी सभागृह नेता सतीश सोनवणे, शशिकांत जाधव यांचा समावेश आहे.
२०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे ६६ नगरसेवक निवडून आले होते. पंचवटी विभागातून सर्वाधिक आत नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. शिंदेसेना स्थापन झाल्यानंतर तसेच लोकसभा निवडणुकीतील राजकीय वारे बदलल्याने अनेक फेरफार झाले आणि विधानसभा निवडणुकीत यश राज्यात भाजपला आल्यानंतर भाजपत भरती आली होती. त्यानंतर आता उमेदवारी देताना भाजपने आपल्या पक्षाच्या अनेक माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारली आहे.
यात धक्कादायकरीत्या माजी महापौर अशोक मुर्तडक, शीतल माळोदे, पूनम सोनवणे, कमलेश बोडके, सतीश सोनवणे, शाहीन मिर्झा, रूची कुंभारकर, शशी जाधव, वर्षा भालेराव, प्रियांका घाटे, अंबादास पगारे, पंडित आवारे, मीरा हांडगे यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे माजी स्वीकृत नगरसेवक श्यामला दीक्षित तसेच प्रशांत जाधव यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. याशिवाय सिडकोतील माजी नगरसेविका हर्षा बडगुजर यांना उमेदवारी नाकारण्यात आली असली तरी त्यांचे पती माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर तसेच सुपुत्र दीपक बडगुजर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.