"मला सर्वच स्वप्नवत वाटत आहे", राजाभाऊ वाजेंचे वक्तव्य 

By Suyog.joshi | Updated: June 4, 2024 14:12 IST2024-06-04T14:07:21+5:302024-06-04T14:12:27+5:30

Nashik Lok Sabha Election Result 2024 : राजाभाऊ वाजे हे सर्वाधिक विक्रमी मतांनी निवडून येण्याच्या मार्गावर आहेत.

nashik lok sabha election result 2024 candidate of uddhav sena group rajabhau waje statement after saw result | "मला सर्वच स्वप्नवत वाटत आहे", राजाभाऊ वाजेंचे वक्तव्य 

"मला सर्वच स्वप्नवत वाटत आहे", राजाभाऊ वाजेंचे वक्तव्य 

नाशिक (सुयोग जोशी) : माझ्या विजयाचे श्रेय हे सर्वसामान्य मतदारांना असून मला हे सर्व स्वप्नवत वाटत असल्याचे लोकसभेच्या नाशिक मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी सांगितले. राजाभाऊ वाजे हे सर्वाधिक विक्रमी मतांनी निवडून येण्याच्या मार्गावर आहेत. गोडसे यांचे यापूर्वीचे विक्रमी आकडे देखील मोडीत काढले जाण्याची चिन्हे आहेत. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात देखील वाजे हे सर्वाधिक विक्रमी मताधिक्याने निवडून येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

यावेळी वाजे म्हणाले, ही निवडणूक धनशक्तीविरूद्ध जनशक्ती अशी झाली. त्यात जनशक्तीचा विजय झाला आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. शिवाय वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास महत्वाचा आहे. प्रारंभी मला खेडूत चेहरा म्हणून विरोधकांकडून हिणवले गेले, मग त्यांना मी माझी इंग्रजी बोलून दाखविल्याचेही त्यांनी सांगितले. हा विजय म्हणजे सर्वसामान्य नागरिक, शिवसैनिकांचा असल्याचेही वाजे यांनी शेवटी सांगितले.

Web Title: nashik lok sabha election result 2024 candidate of uddhav sena group rajabhau waje statement after saw result