Nashik Election Results: A win in the neck of Border Diamonds again from the western constituency, Maharashtra vidhansabha election Results 2019 | नाशिक निवडणूक निकाल : पश्चिम मतदारसंघातून पुन्हा सीमा हिरे यांच्या गळ्यात विजयाची माळ

नाशिक निवडणूक निकाल : पश्चिम मतदारसंघातून पुन्हा सीमा हिरे यांच्या गळ्यात विजयाची माळ

ठळक मुद्देमतदारांनी पुन्हा भाजपला कौल दिला.सीमा हिरे यांना ७७ हजार ७४ मते मिळाली

नाशिक : पाश्चिम मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत पहावयास मिळाली. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी बंड पुकारून थेट भाजपच्या उमेदवार विद्यमान सीमा हिरे यांना आव्हान देत बंडखोर नगरसेवक विलास शिंदे यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरविले. तसेच सीमा हिरे यांना राष्टÑवादीकडून उमेदवारी करणारे डॉ. अपुर्व हिरे यांनीही टक्कर दिली. सीमा हिरे यांनी तब्बल ९ हजार ५२१ इतके मताधिक्य मिळवून विजयश्री प्राप्त केली. त्यांना एकूण ७७ हजारांपेक्षा अधिक मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. अपुर्व हिरे यांना ६७ हजार ५५३ मते मिळाली.
सीमा हिरे यांनी पुर्वीपासून त्यांच्या मतदारांशी असलेला संपर्क टिकवून ठेवल्यामुळे यंदाही त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा प्रारंभ त्यांच्या मतदारसंघातून झाल्याने या यात्रेचाही प्रभाव येथील मतदारांवर पहावयास मिळाला. मतदारांनी त्यांच्या बाजूने दणदणीत कौल दिला. सुरूवातीपासूनच हिरे यांनी आघाडी घेतली होती. अखेरच्या फेरीपर्यंत मोठा फरक त्यांच्या व अपुर्व हिरें यांच्या मतांच्या आकडेवारीत कायम राहिला. २७ फे ऱ्या पूर्ण झाल्यानंतर सीमा हिरे यांना ७७ हजार ७४ मते मिळाली.
पश्चिम मतदार-संघात बंडखोरीची परंपरा चालू निवडणुकीतही जोपासली गेली. ज्या शिवसेनेने गेल्या दोन निवडणुकीत बंडखोरी केली त्यांना त्याचा कधीच फायदा झाला नाही हे खरे असले तरी, त्यांच्या बंडखोरीमुळे दुस-या उमेदवाराचे नुकसान झाल्याचे आजवरच्या लढतीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघात होणा-/या पंचरंगी लढतीतील सर्वच उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सेनेच्या बंडखोरीचा लाभ कोणाला तारक व कोणाला मारक ठरतो याकडे मतदारांचे लक्ष लागले होते; मात्र त्याचा कुठलाही परिणाम भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या विजयावर झाला नाही.
कामगार व मध्यमवर्गीय मतदारांचा भरणा असलेल्या नाशिक पश्चिम मतदारसंघात यंदा चुरशीची निवडणूक होईल याचे संकेत निवडणूकपूर्व तयारीतूनच मिळत होते. त्यामुळे अपेक्षेनुरूप सर्वाधिक उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भाजपाने विद्यमान आमदार सीमा हिरे यांना पुन्हा तिकीट देऊन जागा राखण्याचा निर्णय घेतला आणि तो योग्य ठरला.
या मतदारसंघाने आजपर्यंत एकाच पक्षाची कधीही पाठराखण केलेली नव्हती मात्र या निवडणूकीत ही परंपरा खंडीत झाली आणि मतदारांनी पुन्हा भाजपला कौल दिला. खान्देश व कसमादे येथील मतदारांचा अधिक भरणा असल्यामुळे तेथील राजकीय परिस्थितीचा पश्चिम मतदारसंघावर प्रभाव पडत असतो.

Web Title: Nashik Election Results: A win in the neck of Border Diamonds again from the western constituency, Maharashtra vidhansabha election Results 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.