माझी उमेदवारी दिल्लीतून ठरली! प्रस्ताव मान्य, मात्र अंतिम निर्णय पक्ष घेईल; काय म्हणाले भुजबळ?
By संजय पाठक | Updated: March 30, 2024 15:46 IST2024-03-30T15:45:30+5:302024-03-30T15:46:15+5:30
दरम्यान या संदर्भात आता विद्यमान खासदारांनी आग्रह धरल्यामुळे महायुती काय निर्णय घेते हे आपण बघणार आहोत असे ते म्हणाले. आपल्याला संधी मिळाली तर आपण जरूर काम करू असे ते म्हणाले.

माझी उमेदवारी दिल्लीतून ठरली! प्रस्ताव मान्य, मात्र अंतिम निर्णय पक्ष घेईल; काय म्हणाले भुजबळ?
नाशिक- लोकसभेच्या नाशिकच्या जागेसाठी घमासान सुरू असून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे आल्यानंतर शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आक्रमक झाले आहेत आज सकाळी त्यांनी नाशिकमध्ये मारुती मंदिरात महाआरती करून अप्रत्यक्षरीत्या प्रचाराचा नारळ फोडला तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपल्याला उमेदवारीचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी दिल्लीत झालेल्या बैठकीत महायुतीकडून आला. त्यानुसार आपण चाचपणी केली आहे असे सांगितले. त्यामुळे नाशिकच्या जागेचा सस्पेन्स वाढला आहे.
दरम्यान या संदर्भात आता विद्यमान खासदारांनी आग्रह धरल्यामुळे महायुती काय निर्णय घेते हे आपण बघणार आहोत असे ते म्हणाले. आपल्याला संधी मिळाली तर आपण जरूर काम करू असे ते म्हणाले.
दरम्यान, भुजबळ यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याच्या आधीच नाशिक शहराजवळ ते मराठा आरक्षण विरोधी असल्याचे फलक लावण्यात आले होते त्यावरून भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. लोकशाहीमध्ये अशा प्रकारचे फलक लावणे चुकीचे आहे आपण कधीही मराठा आरक्षणाला विरोध केला नाही असे ते म्हणाले केवळ आपल्यालाच नव्हे तर पंकजा मुंडे आणि प्रणिती शिंदे यांनाही अशाच प्रकारे विरोध झाला आहे. त्यांच्या गाड्या आडवणे आणि गांवबंदीचे फलक लावणे असे प्रकार सुरू आहे. त्यांनी पण कधीही मराठा आरक्षणाला विरोध केला नाही की सभाही घेतल्या नाहीत तरीही होत असलेला विरोध म्हणजे ओबीसी आणि दलित समाजाने निवडणूक लढवायची नाही का असा प्रश्नही भुजबळ यांनी उपस्थित केला. आपण विकासाच्या जोरावरच आजपर्यंत काम करत आलो आहोत जे प्रकल्प नाशिक मध्ये राबवले त्याचा लाभ सर्व समाजाला समाजाला झाला केवळ ओबीसी समाजाला झालेला नाही असेही ते म्हणाले.