नाशिकमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; शांततेत मतदान सुरू
By Suyog.joshi | Updated: May 20, 2024 13:06 IST2024-05-20T13:04:26+5:302024-05-20T13:06:52+5:30
नाशिक परिसरातील मतदान केंद्रावर सकाळी सात ते दुपारी वाजेपर्यंत लांबच लांब रांगा लावून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

नाशिकमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; शांततेत मतदान सुरू
संजय शहाणे, इंदिरानगर (नाशिक) :नाशिक परिसरातील मतदान केंद्रावर सकाळी सात ते दुपारी वाजेपर्यंत लांबच लांब रांगा लावून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे सुमारे परिसरात 35 टक्के मतदान झाल्याचे समजते. सकाळी सात वाजेपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत स्वामी विवेकानंद शाळा, केंब्रिज स्कूल, डे केअर सेंटर शाळा,जाजू विद्यालय सुखदेव शाळा, वडाळा गाव मनपा शाळा, के बी एच विद्यालय समाज मंदिर,सह परिसरातील मतदान केंद्रावर व बुथवर युवक ,युवती, महिला, पुरुष ,व ज्येष्ठ नागरिक यांनी मतदानासाठी गर्दी केली होती.
त्यामुळे मतदाराला काही बुथवर मतदानासाठी दहा ते पंधरा मिनिटांचे तर काही बुथवर अर्धा तासाच्या वर रांगेत उभे राहावे लागत होते तसेच मोबाईल मतदान केंद्रात नेण्यास पोलिसांकडून मज्जा होत होता त्यामुळे बहुतेक नागरिकांनी आणलेले मोबाईल बाहेर असलेल्या स्वयंसेवाकडे ठेवून मतदानाला गेले होते सेल्फी काढण्यासाठी मतदारांनी गर्दी केल्याचे दिसून आले.