Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 19:31 IST2025-12-30T19:29:30+5:302025-12-30T19:31:12+5:30
Nashik Municipal Election 2026: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत नाशिक भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून मोठा गोंधळ झाला.

Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत नाशिक भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून मोठा गोंधळ झाला. निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या बाहेर सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवार कैलास आहिरे यांच्यात बाचाबाची झाली, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यावेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता. नाशिक पश्चिममधील प्रभाग क्रमांक २६ मधून कैलास आहिरे हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यांना उमेदवारी मिळेल, असा शब्द वरिष्ठांकडून देण्यात आला होता. परंतु ऐनवेळी त्यांचे नाव कापले गेल्याचे समजताच आहिरे आणि त्यांचे समर्थक आक्रमक झाले. दरम्यान, निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या बाहेर भाजप पदाधिकारी आणि सीमा हिरे समोरासमोर आल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या संपूर्ण गोंधळाचा व्हिडीओ उपस्थित कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये कैद केला. यामध्ये इच्छुक उमेदवार आणि सीमा हिरे संताप व्यक्त करताना दिसत आहेत. नाशिकमध्ये भाजपमधील हा वाद आता चव्हाट्यावर आल्याने आगामी निवडणुकीत पक्षाला बंडखोरीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. इच्छुकांची वाढती संख्या आणि मर्यादित जागा यामुळे भाजपसमोर मोठे आव्हान असेल.