"भाजपाला इथे कुबड्यांची गरज नाही"; गिरीश महाजनांनी शिंदेसेनेला लोटलं दूर, नेते शिंदेंकडे करणार तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 15:29 IST2026-02-02T15:27:15+5:302026-02-02T15:29:33+5:30

मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर महापालिकांसह इतर काही महापालिकांमध्ये शिंदेसेना-भाजपा एकत्र आहेत. मात्र, नाशिकमध्ये भाजपाने शिंदेसेनेला सत्तेत सामील करून घेण्यास नकार दिला आहे. 

"BJP doesn't need hunchbacks"; Girish Mahajan's Shinde Sena has been ostracized, leaders will complain to Shinde | "भाजपाला इथे कुबड्यांची गरज नाही"; गिरीश महाजनांनी शिंदेसेनेला लोटलं दूर, नेते शिंदेंकडे करणार तक्रार

"भाजपाला इथे कुबड्यांची गरज नाही"; गिरीश महाजनांनी शिंदेसेनेला लोटलं दूर, नेते शिंदेंकडे करणार तक्रार

"नाशिकमध्ये आम्ही परस्परांविरोधात लढलो, त्यामुळे इथे मित्रपक्षांना सोबत घेण्याची गरज नाही. नाशिकमध्ये भाजपाला कुबड्यांची गरज नाही", असे विधान करत भाजपाचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी शिंदेसेनेला नाशिकमध्ये झटका दिला. गिरीश महाजन यांच्या विधानानंतर शिंदेसेनेच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार आहेत. 

कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद झाली. त्यावेळी शिंदेसेनेला नाशिक महापालिकेत सत्तेत सोबत घेणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता. 

'भाजपाला कुबड्यांची गरज नाही'

गिरीश महाजन म्हणाले, "नाशिकमध्ये आम्ही परस्पराविरोधात लढलो, त्यामुळे येथे मित्रपक्षांना सोबत घेण्याची गरज नाही. तशी कुठलीही चर्चा झालेली नाही. तसा काही प्रस्ताव आलेला नाही. नाशिकमध्ये भाजपाला कुबड्यांची गरज नाही. भाजपाचे ७२ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांच्यात महत्त्वाची पदे वाटली जातील", असे ते म्हणाले. 

गिरीश महाजन यांनी जळगाव महापालिकेचा संदर्भ देत पुढे असेही म्हणाले की, "आम्ही एकत्र लढलो असतो, तर तसा विचार झाला असता. जळगावमध्ये भाजपाला १०० टक्के यश मिळाले. शिवसेनेचे २० नगरसेवक निवडून आले आहेत. तिथे एकत्रितपणे सत्ता स्थापन केली जाईल. मात्र, जिथे विरोधात लढलो आणि आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे, तिथे मित्रपक्षांना सोबत घेणे शक्य नाही", असे महाजन यांनी स्पष्ट केले. 

शिंदेसेनेचे नेते संतापले, उपमुख्यमंत्री शिंदेंकडे तक्रार करणार?

शिंदेसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांनी गिरीश महाजनांच्या विधानावर बोलताना सांगितले की, "भाजपाचे वागणे अनाकलनीय आहे. भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केदार स्वतः आमच्या पक्ष कार्यालयात आले होते. त्यांनीच सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला होता. आता त्यांचे सर्वेसर्वा गिरीश महाजन कुबड्या नको असे म्हणत आहेत. हा शब्दप्रयोग अत्यंत चुकीचा आहे", असा संताप बोरस्त यांनी व्यक्त केला. 

"आम्ही या संपूर्ण प्रकरणाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहोत. एकनाथ शिंदे जो आदेश देतील, तो आम्ही पाळू. त्यांनी विरोधी बाकावर बसण्यास सांगितले, तर आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावू", असेही बोरस्ते यांनी म्हटले आहे. 

Web Title : भाजपा को बैसाखियों की जरूरत नहीं: महाजन ने शिंदे सेना को नाशिक से दूर किया

Web Summary : गिरीश महाजन ने कहा कि भाजपा को नाशिक में सहयोगियों की जरूरत नहीं है, जिससे शिंदे सेना नाराज है। महाजन ने जोर देकर कहा कि नाशिक भाजपा के पास स्वतंत्र रूप से शासन करने के लिए पर्याप्त पार्षद हैं। नाराज सेना के नेता महाजन के 'बैसाखी' वाले बयान की शिकायत एकनाथ शिंदे से करेंगे।

Web Title : BJP Needs No Crutches: Mahajan Distances Shinde Sena in Nashik

Web Summary : Girish Mahajan stated BJP doesn't need allies in Nashik, irking Shinde Sena. Nashik BJP has enough corporators to rule independently, Mahajan asserted. Angered Sena leaders plan to complain to Eknath Shinde regarding Mahajan's statement about not needing 'crutches'.