'रेकॉर्डब्रेक जागांसह आम्हीच सत्तेत येणार' मतदानाचा हक्क बजावल्यानंतर नितीन गडकरींचा विश्वास
By मोरेश्वर मानापुरे | Updated: January 15, 2026 19:49 IST2026-01-15T19:49:03+5:302026-01-15T19:49:29+5:30
Nagpur : नागपूरच्या जनतेने आम्हाला सलग तीन वेळा सत्तेत बसवून कामाची संधी दिली. आम्ही केलेल्या विकासकामांच्या जोरावर यंदाही विक्रमी जागा जिंकून आम्हीच सत्तेत येऊ, असा ठाम विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केला.

'We will come to power with record-breaking seats': Nitin Gadkari confident after exercising his right to vote
नागपूर : नागपूरच्या जनतेने आम्हाला सलग तीन वेळा सत्तेत बसवून कामाची संधी दिली. आम्ही केलेल्या विकासकामांच्या जोरावर यंदाही विक्रमी जागा जिंकून आम्हीच सत्तेत येऊ, असा ठाम विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केला. नागपुरात आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
विकासाच्या जोरावर ‘रेकॉर्डब्रेक’ विजयाची खात्री
गडकरी म्हणाले, गेल्या अनेक वर्षांत नागपूर आणि परिसरात मोठी विकासकामे झाली आहेत. या कामांवर जनता समाधानी असून, त्याचा सकारात्मक परिणाम निकालात दिसेल. आम्ही केलेल्या कामांवर आम्ही सकारात्मक आहोत. गेल्या वेळेपेक्षाही यावेळी आम्हाला चांगले मतदान होईल आणि आम्ही रेकॉर्डब्रेक जागांसह सत्तेत परतू, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
मतदार याद्यांच्या घोळावर नाराजी
निवडणुकीतील मतदार याद्यांमधील गोंधळावर गडकरींनी स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, खुद्द गडकरींच्या घरातही हा घोळ पाहायला मिळाला. गडकरी म्हणाले, मतदार याद्यांतील नावांचा घोळ नेहमीच असतो. यावेळी माझ्याही घरात हे घडले. कुटुंबातील ५ सदस्य एका बूथवर तर इतर सदस्य दुसऱ्या बूथवर मतदानासाठी गेले. निवडणूक आयोगाने याद्यांमधील हा घोळ तातडीने दुरुस्त करावा, जेणेकरून एकही नागरिक मतदानापासून वंचित राहणार नाही, असे आवाहन त्यांनी केले. सर्वांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले, तर मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढेल.
भूषण शिंगणे यांच्यावरील हल्ला ‘दुर्भाग्यपूर्ण’
भूषण शिंगणे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवर बोलताना गडकरींनी तीव्र निषेध नोंदवला. ही घटना अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. लोकशाहीच्या उत्सवात अशा हिंसक घटनांना स्थान असू नये. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करतीलच, असे त्यांनी स्पष्ट केले.