पुढच्या निवडणूकीत रालोआचा नारा काय ? चक्क 'पाचशे पार', रामदास आठवलेंचे वक्तव्य
By योगेश पांडे | Updated: April 10, 2024 17:55 IST2024-04-10T17:52:49+5:302024-04-10T17:55:49+5:30
रालोआकडून 'अब की बार चारशे पार' असा नारा देण्यात येत असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुढील निवडणूकीचा नारा काय असेल ते सांगितले.

पुढच्या निवडणूकीत रालोआचा नारा काय ? चक्क 'पाचशे पार', रामदास आठवलेंचे वक्तव्य
योगेश पांडे, कन्हान(रामटेक) : रालोआकडून अब की बार चारशे पार असा नारा देण्यात येत असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुढील निवडणूकीचा नारा काय असेल ते सांगितले. या निवडणूकीत आमचा नारा चारशे पारचा असला तरी २०२९ च्या निवडणूकीत हाच नारा पाचशे पार असा असेल असा दावा त्यांनी केला.
रामटेक लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते.मोदी परत सत्तेवर आले तर लोकशाही धोक्यात येईल असा विरोधकांकडून अपप्रचार करण्यात येत आहे. मात्र कोण म्हणतो देशाची घटना बदलल्या जाणार आहे. संविधान देशाची आत्मा आहे. लोकशाही धोक्यात कशी येऊ शकते असा सवाल रामदास आठवले यांनी उपस्थित केला. राहुल गांधी एकीकडे भारत जोडो यात्रा करत आहेत, तर दुसरीकडे समाजाला तोडण्याची भूमिका मांडत आहेत. त्यांची ही भूमिका बरोबर नाही. कॉग्रेस पक्षाला त्यांनी बदनाम केले आहे, असा आरोप त्यांनी लावला.