'नागपूरसह एकूणच विदर्भाच्या विकासाची दिशा चुकली' ॲड. प्रकाश आंबेडकरांचे स्पष्ट मत
By आनंद डेकाटे | Updated: January 7, 2026 19:46 IST2026-01-07T19:45:36+5:302026-01-07T19:46:51+5:30
Nagpur : प्रत्येक शहराची एक स्वतंत्र ओळख असते. खुबी असते. क्षमता असते. शहरांची ही क्षमता पाहूनच विकासाचे धोरण राबविण्याची गरज आहे. ऑरेंज सिटी, कॉटन सिटी हीच नागपूरची क्षमता.

'The development of Vidarbha as a whole, including Nagpur, has gone in the wrong direction', says Adv. Prakash Ambedkar
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रत्येक शहराची एक स्वतंत्र ओळख असते. खुबी असते. क्षमता असते. शहरांची ही क्षमता पाहूनच विकासाचे धोरण राबविण्याची गरज आहे. ऑरेंज सिटी, कॉटन सिटी हीच नागपूरची क्षमता. या आधारावर उद्योग व विकासाचे धोरण राबविल्यास खऱ्या अर्थाने परिवर्तन दिसून येईल. परंतु तसे झाले नाही. नागपूरसह एकूणच विदर्भाच्या विकासाची दिशाच चुकली आहे, असे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲड. प्रकाश आंबेडकर हे पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बुधवारी नागपुरात आले असता त्यांनी लोकमत भवनला सदिच्छा भेट दिली. लोकमत टाईम्सचे संपादक एन.के. नायक व लोकमत नागपूरचे संपादक श्रीमंत माने यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांचेसोबत यावेळी त्यांनी लोकमतच्या संपादकीय सहकाऱ्यांशी मनमोकळी चर्चा केली. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, सध्या ज्याची गरज आहे, ते होताना दिसत नाही आणि ज्याची गरज नाही, त्याकडे धावले जात आहे. काॅटन व संत्रा ही आपली ओळख आहे. काॅटन व संत्रा सिटी म्हणून विकास करता येऊ शकतो. सरकार मेकींग इंडियावर भर देत आहे. परंतु मेक इन इंडिया ऐवजी मेड इन इंडियावरवर भर देण्याची गरज आहे. कारण मेड इन इंडिया हा विचार संशोधनाला प्रोत्साहित करणारा आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी देश विदेशातील राजकारणासह प्रदूषण, पर्यावरण, धर्म, समाजकारण या विषयावर मनमोकळी चर्चा केली.
नागपुरात विमानांचे मेंटनन्स सेंटर ही जागतिक मागणी
नागपूरच्या आकाशावरून साडेसातशेवर फ्लाईट जातात. येथे विमानांचे इमरजेंसी मेंटनन्स सेंटर व्हावे, अशी जगभरातून मागणी आहे. परंतु याकडे कुणीच लक्ष देत नाही. येथे इंटरनॅशन इमरजेंसी सेंटर तयार झाले तर एकट्या मनपाचा अर्थसंकल्प हा ४२ हजार कोटींवर जाईल. यातून मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होईल, असेही ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.