नागपूर निवडणुकीत एका महिन्याच्या बाळासह उतरल्या प्रचारात ; पायल कुंदेलवारने विरोधकही केले थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 16:09 IST2026-01-10T16:08:40+5:302026-01-10T16:09:17+5:30
Nagpur : नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग ३० मधून भाजपची उमेदवार पायल कुंदेलवार यांनी निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत एक वेगळाच ठसा उमटवला आहे.

Payal Kundelwar surprised even the opposition by campaigning with a one-month-old baby in Nagpur elections
नागपूर:नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग ३० मधून भाजपची उमेदवार पायल कुंदेलवार यांनी निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत एक वेगळाच ठसा उमटवला आहे. त्यांच्या जिद्दीने आणि दृढ निर्धाराने विरोधकांचे देखील लक्ष वेधले आहे.
पायल यांनी आताच एका महिन्याच्या शर्वरी या त्यांच्या बाळाला सोबत घेऊन प्रचारात उतरल्या आहेत, ज्यामुळे जनमानसातही त्यांचे कौतुक वाढले आहे. राजकारण आणि मातृत्व या दोन्ही जबाबदाऱ्या एकत्र सांभाळत त्यांनी लोकसेवेचा आत्मा जिवंत ठेवला आहे.
निवडणूकी जाहीर झाल्या त्या काळातच पायल यांना मातृत्वाचा आनंद मिळाला, परंतु त्यांनी घरात न राहून, प्रचार करण्याचा निर्णय घेतला व आपल्या मतदारांशी संवाद साधण्यासाठी मैदानात उतरण्याचं ठरवलं. सगळीकडे उन्हात आणि प्रचाराच्या धबडग्यांमध्ये कधी बाळाला गाडीत ठेवून, कधी घरात सोडून, तर कधी त्यांना कडेवर घेऊनही मतदारांशी भेट घेताना पायल दिसून येत आहेत.
पायल कुंदेलवार यांनी सांगितले की, “भाजप हा असा पक्ष आहे जो स्त्रियांना कधीच कमकुवत मानत नाही.” त्यांनी नऊ महिने गर्भवती असतानाही काम करत राहिलं आणि आता शर्वरी या त्यांच्या प्रवासात सोबत आहे, असं ते म्हणाल्या.
शेवटी, प्रभाग ३० मधील नागरिक पायल यांच्या या निर्धाराला दिलेलं कौतुक आणि त्यांच्या प्रचारातील अनोख्या पद्धतीमुळे आता नागपूरचं मतदार वर्ग त्यांची बाजू कशी धरतो, हे पाहणं पुढील काळात महत्त्वाचं ठरणार आहे.