प्रकाश देवतळे यांचा काँग्रेसला रामराम; प्रदेशाध्यक्षांवर नाराजी 

By कमलेश वानखेडे | Published: March 29, 2024 05:25 PM2024-03-29T17:25:21+5:302024-03-29T17:28:00+5:30

भाजप नेत्यांच्या संपर्कात.

nagpur prakash deotale has resigned to congress party displeasure with the state president | प्रकाश देवतळे यांचा काँग्रेसला रामराम; प्रदेशाध्यक्षांवर नाराजी 

प्रकाश देवतळे यांचा काँग्रेसला रामराम; प्रदेशाध्यक्षांवर नाराजी 

कमलेश वानखेडे, नागपूर : पूर्व विदर्भात कॅाग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. चंद्रपूर जिल्हा कॅाग्रेसचे माजी अध्यक्षप्रकाश देवतळे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये हुकुमशाही, परिवारवाद आणि दिशाहिन प्रदेश नेतृत्त्व असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

प्रकाश देवतळे म्हणाले, बहुसंख्य असलेल्या तेली समाजाला काँग्रेसने विदर्भात एकही उमेदवारी दिलेली नाही. तेली समाज काँग्रेसच्या पाठिशी राहिला आहे. पण त्याची प्रदेश अध्यक्षांनी दखल घेतली नाही. त्यामुळे नाराजीतून आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देवतळे हे उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. भाजपमध्ये प्रवेश घेणार का, हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही.

Web Title: nagpur prakash deotale has resigned to congress party displeasure with the state president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.