मायावतींची उद्या जाहीर सभा, दीक्षाभूमीला देणार भेट!

By आनंद डेकाटे | Updated: April 10, 2024 14:58 IST2024-04-10T14:57:31+5:302024-04-10T14:58:11+5:30

Lok Sabha Elections 2024: लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील पाच जागांसाठी मतदान होणार आहे.

Mayawati rally tomorrow in nagpur, Lok Sabha Elections 2024 | मायावतींची उद्या जाहीर सभा, दीक्षाभूमीला देणार भेट!

मायावतींची उद्या जाहीर सभा, दीक्षाभूमीला देणार भेट!

नागपूर : उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री व बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांची जाहीर सभा गुरूवार ११ एप्रिल रोजी  दुपारी ३ वाजता बेझनबाग मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील पाच जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये नागपुरातून योगेश लांजेवार, रामटेकमधून संदीप मेश्राम, भंडारा-गोंदिया संजय कुभलकर, गडचिरोली -चिमूर योगेश गोन्नारे आणि चंद्रपूर येथून राजेंद्र रामटेके हे बसपाचे उमेदवार आहेत. या पाचही उमेदवारांच्या प्रचारासाठी मायावती यांची नागपुरात जाहीर सभा घेत आहेत. 

मायावती या दुपारी नागपूरला येतील. दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन करतील. त्यानंतर जाहीर सभेला मार्गदर्शन करतील.

Web Title: Mayawati rally tomorrow in nagpur, Lok Sabha Elections 2024