निवडणूकीच्या दिवशी नागपूर शहर बस सेवेसंदर्भात मनपाची महत्त्वाची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 20:00 IST2026-01-14T19:57:56+5:302026-01-14T20:00:17+5:30
Nagpur : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ करिता गुरुवार, १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

Important notice from Nagpur Municipal Corporation regarding city bus service on election day
नागपूर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ करिता गुरुवार, १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागामार्फत शहर बस सेवेसंदर्भात नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार, सकाळी ६:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत शहरातील प्रमुख मार्गांवर तसेच इनर रिंग रोडवर २५० विशेष बसेस धावणार आहेत. या कालावधीत बाहेरील भागातून येणाऱ्या बसेस केवळ शहराच्या ऑक्ट्रॉय (नाका) हद्दीपर्यंतच चालवण्यात येतील.
दुपारी १:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत शहर बस सेवा मर्यादित स्वरूपात राहणार असून प्रमुख मार्गांवर ५० बसेस कार्यान्वित असतील. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सुधारित मार्ग व गंतव्यस्थानांचे फलक बसवर स्पष्टपणे लावण्यात येणार आहेत.
मनपा प्रशासनाने नागरिकांना या सूचनेची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. बस सेवेसंदर्भात अडचण असल्यास ग्राहक सेवा व्हॉट्सॲप क्रमांक ८९७६७ १९६२० वर संपर्क साधता येईल.