भाजप दाऊदलाही उमेदवारी देण्यास तयार होईल; त्यांचे पॉवर जिहाद सुरु
By कमलेश वानखेडे | Updated: November 13, 2024 18:25 IST2024-11-13T18:24:11+5:302024-11-13T18:25:32+5:30
नाना पटोले यांची टीका : योगींनी हिंदु मुस्लिम करू नये

BJP will be ready to field Dawood too; Their Power Jihad started
कमलेश वानखेडे, नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंदू मुस्लिम करू नये. यांना बोलायचा आहे तर नवाब मलिक बद्दल बोलावे. उद्या दाऊदही यांच्या पक्षातून उभा झाला तर ते तयार होऊन जातील. यांचे पॉवर जिहाद सुरू आहे. नवाब मलिक यांना १७ महिने यांनीच तुरुंगात पाठवले होते. ते आता यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत आणि हे इथे येऊन ‘बटेंगे तो कटेंगे’ असे बोलतात. त्यांनी महाराष्ट्रातील मुद्द्यांवर बोलावे. महाराष्ट्रातील जनता हे अजिबात स्वीकारणार नाही, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सुनावले.
बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, उत्तर प्रदेशातच योगी यांनी आपले राजकारण सुरू ठेवावे. महाराष्ट्रात असे घाणेरडे राजकारण चालत नाही. महाराष्ट्रातील त्यांच्याच सरकारमध्ये कधी उर्स तर कधी गणेश उत्सवावर हल्ला केला जातो. महाराष्ट्रात बेरोजगारी, शेतकरी, महागाई, महिला सुरक्षा हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. या मुद्द्यावर भाजपचे लोक बोलत नाही. महायुती सरकारने महाराष्ट्राला कर्जात बुडावण्याचे काम केले आहे. दहा लाख कोटींचे उद्योग महाराष्ट्रातून गुजरातला पाठवले आहेत, अशी टीका त्यांनी केला. भाजप शेतकरी विरोधी असल्याने ते शेतकऱ्यांच्या फायद्याचे काही करणार नाही. सोयाबीन, कापूस या सगळ्या पिकांना आणि दुधाला एमएसपी पेक्षा जास्त भाव देण्याची भूमिका काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची राहील, असे त्यांनी आश्वस्त केले.