नागपुरात काँग्रेसच्या माजी नगरसेविकेला भाजपचे तिकीट; निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोप
By योगेश पांडे | Updated: December 29, 2025 18:32 IST2025-12-29T18:27:31+5:302025-12-29T18:32:05+5:30
Nagpur : उत्तर नागपुरातील प्रभाग दोनमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तेथील माजी नगरसेविका नेहा निकोसे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून त्यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे.

BJP gives ticket to former Congress corporator in Nagpur; Accusations of ignoring loyal workers
नागपूर : उत्तर नागपुरातील प्रभाग दोनमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तेथील माजी नगरसेविका नेहा निकोसे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून त्यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे. त्या प्रभागातून आणखीन काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे माजी मंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात तेथे मोठ्या प्रमाणावर रोष असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे.
नेहा निकोसे या २०१७ मध्ये प्रभाग २ मधून निवडून आल्या होत्या. मात्र यावेळी त्यांना काँग्रेसने डाववल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला व लगेच त्यांना तिकीट मिळाले. सोबतच उत्तर नागपूर अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष बाबू खान, महेंद्र बोरकर, राकेश निकोसे यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. माजी मंत्री नितीन राऊत हे निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोप बाबू खान यांनी केला.