मोठी बातमी: अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार; फडणवीस सरकारमध्ये शपथविधी झालेल्या ३९ मंत्र्यांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 18:07 IST2024-12-15T16:51:39+5:302024-12-15T18:07:15+5:30

महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर दिल्याचं दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून काही चेहरे मंत्रिमंडळात घेण्यात आले आहेत. 

Big news maharashtra Cabinet expansion List of 39 ministers sworn in devendra Fadnavis government | मोठी बातमी: अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार; फडणवीस सरकारमध्ये शपथविधी झालेल्या ३९ मंत्र्यांची यादी

मोठी बातमी: अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार; फडणवीस सरकारमध्ये शपथविधी झालेल्या ३९ मंत्र्यांची यादी

Maharashtra Cabinet Oath Taking Ceremony ( Marathi News ) :देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपूरच्या राजभवनात पार पडला. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या १६ डिसेंबरपासून सुरू होत असताना एक दिवस आधी हा शपथविधी सोहळा घेण्यात आला. १९९१ नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी झाला असून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नवीन ३९ मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

मंत्रिमंडळात कोणकोणत्या नेत्यांना स्थान?
१. चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)
२. राधाकृष्ण विखे-पाटील (भाजप)
३. हसन मुश्रीफ  (राष्ट्रवादी-अजित पवार)
४. चंद्रकांत पाटील (भाजप)
५. गिरीश महाजन (भाजप)
६. गुलाबराव पाटील (शिवसेना-एकनाथ शिंदे)
७. गणेश नाईक (भाजप)
८. दादा भुसे (शिवसेना-एकनाथ शिंदे)
९. संजय राठोड (शिवसेना-एकनाथ शिंदे)
१०. धनंजय मुंडे  (राष्ट्रवादी-अजित पवार)
११. मंगलप्रभात लोढा (भाजप)
१२. उदय सामंत (शिवसेना-एकनाथ शिंदे)
१३. जयकुमार रावल (भाजप)
१४. पंकजा मुंडे (भाजप)
१५. अतुल सावे (भाजप)
१६. अशोक उईके (भाजप)
१७. शंभूराज देसाई (शिवसेना-एकनाथ शिंदे)
१८. आशिष शेलार (भाजप)
१९. दत्तात्रय भरणे  (राष्ट्रवादी-अजित पवार)
२०. आदिती तटकरे  (राष्ट्रवादी-अजित पवार)
२१. शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप)
२२. माणिकराव कोकाटे  (राष्ट्रवादी-अजित पवार)
२३. जयकुमार गोरे (भाजप)
२४. नरहरी झिरवळ  (राष्ट्रवादी-अजित पवार)
२५. संजय सावकारे (भाजप)
२६. संजय शिरसाट  (शिवसेना-एकनाथ शिंदे)
२७. प्रताप सरनाईक (शिवसेना-एकनाथ शिंदे)
२८. भरत गोगावले (शिवसेना-एकनाथ शिंदे)
२९. मकरंद पाटील  (राष्ट्रवादी-अजित पवार)
३०. नितेश राणे (भाजप)
३१. आकाश फुंडकर (भाजप)
३२. बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी-अजित पवार)
३३. प्रकाश आबिटकर (शिवसेना-एकनाथ शिंदे)
३४. माधुरी मिसाळ (भाजप)
३५. आशिष जैस्वाल (शिवसेना-एकनाथ शिंदे)
३६. पंकज भोयर (भाजप)
३७. मेघना बोर्डिकर (भाजप)
३८. इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी-अजित पवार)

३९. योगेश कदम (शिवसेना-एकनाथ शिंदे)

दरम्यान, महायुतीच्यामंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर दिल्याचं दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून काही चेहरे मंत्रिमंडळात घेण्यात आले आहेत. 

Web Title: Big news maharashtra Cabinet expansion List of 39 ministers sworn in devendra Fadnavis government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.