मुसळधार पावसाचा इशारा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 18:31 IST2020-09-23T18:31:22+5:302020-09-23T18:31:44+5:30

पावसाचा वेग गुरुवारी देखील कायम राहणार

Warning of torrential rain maintained | मुसळधार पावसाचा इशारा कायम

मुसळधार पावसाचा इशारा कायम

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगराला बुधवारी झोडपून काढलेल्या पावसाचा वेग गुरुवारी देखील कायम राहणार आहे. २४ सप्टेंबर रोजी शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. २५ सप्टेंबर रोजी शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. २४ सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. २५ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: Warning of torrential rain maintained