Jay Maharashtra, tweeted by Sanjay Raut and extended suspension of mahashivaaghadi | संजय राऊतांकडून 'जय महाराष्ट्र', 'त्या' ट्विटमुळे महाशिवआघाडीचा सस्पेन्स आणखी वाढला
संजय राऊतांकडून 'जय महाराष्ट्र', 'त्या' ट्विटमुळे महाशिवआघाडीचा सस्पेन्स आणखी वाढला

मुंबई - महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा दावा करू इच्छिणाऱ्या पक्षांना पाठिंबा दिल्याचे प्रत्येक आमदाराचे त्याच्या स्वाक्षरीचे पत्र सादर करावे, अशी अट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घातली असल्याच्या ‘लोकमत'च्या वृत्ताला शिवसेना नेते खा संजय राऊत यांनी सोमवारी दुजोरा दिला. ते म्हणाले की, 288 पैकी 170 आमदारांची पाठिंब्याची पत्रे लवकरच राज्यपालांना सादर करू. मात्र, शरद पवारांनी सोनिया गांधींच्या भेटीनंतर शिवसेनेसोबत कसलिही चर्चा सुरू नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे महाशिवआघाडीचा सस्पेन्स आणखी वाढलाय.  

शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा ट्विट केले आहे. मात्र, आजच्या ट्विटमध्ये त्यांनी जय महाराष्ट्र असे लिहलंय. त्यामुळे हे ट्विट नेमकं कोणासाठी आहे, याचा अनेक प्रकार कयास लावता येईल. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना, सोनिया आणि माझ्यात महाशिवआघाडीसंदर्भात कुठलिही चर्चा झाली नसल्याचं म्हटलंय. तसेच, मिनिमम कॉमन प्रोग्रामचंही काहीच ठरलं नसल्याच पवारांनी म्हटलंय. त्यामुळे महाशिवआघाडीच्या सरकार स्थापनेबाबतचा गोंधळ आणखी वाढला आहे. त्यामुळेच नेहमीच भाजपा नेत्यांवर टीका करणाऱ्या संजय राऊतांचे आजचे ट्विट नेमकं कोणाला उद्देशून आहे, याची चर्चा रंगणार हे नक्की. 

अगर जिंदगी मे कुछ पाना है
तो तरीके बदलो, इरादे नही

जय महाराष्ट्र....

असे ट्विट राऊत यांनी केले आहे. त्यामुळे आता महाशिवआघाडीचा सस्पेन्स आणखी वाढला आहे. संजय राऊत यांनी नेमकं कोणाला जय महाराष्ट्र केलाय, हे सध्यातरी अनुत्तरीतच आहे. मात्र, काही दिवसांपासून शिवसेनेनं भाजपाला जय महाराष्ट्र केल्याचं दिसून आलंय. 


दरम्यान, सरकार स्थापनेसाठीच्या पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक आमदाराच्या निळ्या शाईत सही असलेले पत्र द्यावे, त्यावर आपण स्वखुशीने स्वाक्षरी केली आहे असे आमदाराने लिहून द्यावे आणि प्रत्येक पत्र संबंधित पक्षाच्या नेत्याने साक्षांकित करावे, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सांगितले आहे. खा. राऊत म्हणाले की, आमदारांच्या पाठिंब्याच्या पत्रांसह आम्ही राज्यपालांची भेट घेऊ. त्यानंतर आणखी आमदारही आमच्या सरकारला पाठिंबा द्यायला पुढे येतील. 
 

Web Title: Jay Maharashtra, tweeted by Sanjay Raut and extended suspension of mahashivaaghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.