sonali kulkarni shares husband and daughter picture on social media | सोनाली कुलकर्णीच्या पती आणि मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का? शेअर केला सोशल मीडियावर

सोनाली कुलकर्णीच्या पती आणि मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का? शेअर केला सोशल मीडियावर

ठळक मुद्देगुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत तिने तिच्या संपूर्ण कुटुंबियांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत तिने तिच्या संपूर्ण कुटुंबियांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

सोनालीच्या या फोटोत आपल्याला तिचा पती, मुलगी यांना पाहायला मिळत आहे. हा फोटो सोशल मीडियावर नऊ हजाराहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. 

आनंदाची आणि आरोग्याची गुढी उभारूया 🙏💕💕 #HappyGudiPadwa #गुढीपाडवा

Posted by SonaliKulkarni on Tuesday, April 13, 2021

सोनाली कुलकर्णी हे नाव आज मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय महत्त्वाचे मानले जाते. 'दिल चाहता है' हा चित्रपट सोनालीच्या करियरचा टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटाने तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सोनाली आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनबाबत नेहमीच सजग असते. गेल्या अनेक वर्षांपासून सोनाली सिनेसृष्टीत काम करते आहे. मात्र तिच्याकडे पाहून कुणालाही वाटणार नाही की तिने वयाची चाळीशी गाठली आहे. चाळीशीत असलेल्या सोनालीने उत्तम फिगर मेंटेन केली आहे. आजही सोनाली फारच ग्लॅमरस दिसते.

सोनालीने मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sonali kulkarni shares husband and daughter picture on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.