सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर करतायेत संगीत सेरमनीसाठी नृत्याची तालीम, पाहा हे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:56 PM2021-01-21T16:56:59+5:302021-01-21T17:01:00+5:30

आता संगीत सेरेनमीसाठी मिताली आणि सिद्धार्थ यांनी तालीम करायला सुरुवात केली आहे. या तालमीचे काही व्हिडिओ आणि फोटो सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील स्टोरीत शेअर केले आहेत.

Siddharth Chandekar and Mithali Mayekar are training for the music ceremony, see this photo | सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर करतायेत संगीत सेरमनीसाठी नृत्याची तालीम, पाहा हे फोटो

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर करतायेत संगीत सेरमनीसाठी नृत्याची तालीम, पाहा हे फोटो

googlenewsNext
ठळक मुद्देमराठी इंडस्ट्रीतील कपल सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर दोघे कधी लग्नबंधनात अडकणार याकडेच सा-यांचे लक्ष लागले होते.

सध्या लग्नाचा मोसम सुरू आहे. सगळीकडे लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटीसुद्धा याला अपवाद नाहीत. गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी सेलिब्रिटींचं शुभमंगल पार पडलं आहे. त्यामुळेच मराठी सिनेसृष्टीत सध्या सनई चौघड्यांचे सूर ऐकू येत आहेत. अभिज्ञा भावे, आशुतोष कुलकर्णीनंतर, मानसी नाईक आणि आता अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांच्याही लग्नाचे सूर ऐकायला मिळत आहेत.

सध्या सिद्धार्थ आणि मिताली दोघांच्याही घरी लगीन घाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सिद्धार्थच्या घरी ग्रहमख पूजा करण्यात आली. या पूजेपासून लग्नाच्या विधींना सुरुवात झाली होती.सिद्धार्थ चांदेकरने गृहमुख पुजेचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले होते आणि आता संगीत सेरेनमीसाठी मिताली आणि सिद्धार्थ यांनी तालीम करायला सुरुवात केली आहे. या तालमीचे काही व्हिडिओ आणि फोटो सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील स्टोरीत शेअर केले आहेत. त्यांची ही तालीम पाहून त्यांची संगीत सेरेमनी लवकरच असणार हे आपल्या लक्षात येत आहे.

मराठी इंडस्ट्रीतील कपल सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर दोघे कधी लग्नबंधनात अडकणार याकडेच सा-यांचे लक्ष लागले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगत होत्या. अखेर तो क्षण आला आणि आता हे कपल त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या दोघांचं लग्न पुण्यापासून एका तासाच्या अंतरावर असलेल्या एका जुन्या वाड्यामध्ये होणार आहे. या दोघांच्या लग्नाची तारीख गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत.दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थने मितालीला प्रपोज केलं होतं.

लग्न ठरल्यापासून त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट ते चाहत्यांसह शेअर करत असतात. तसेच त्यांचे रोमँटीक फोटो शेअर करत कपल गोलही देताना दिसायचे. चाहत्यांनाही त्यांचे केमिस्ट्री खूप पसंत येते. त्यामुळे त्यांच्या फोटोंना चाहतेही खूप सारे लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.

Web Title: Siddharth Chandekar and Mithali Mayekar are training for the music ceremony, see this photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.