ठळक मुद्देरिंकूने उन्हाने त्रासले म्हणत तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. रिंकूने चित्रीकरणाच्या दरम्यान हा फोटो काढलेला असून हा फोटो पाहून रिंकू किती थकलेली आहे हे आपल्या लक्षात येत आहे.

उन्हामुळे सगळेच त्रासले आहेत. अंगाची लाहीलाही होत आहे. सामान्य लोकांप्रमाणे प्रेक्षकांची लाडकी रिंकू राजगुरू देखील उन्हाने त्रासली आहे. तिनेच एक फोटो पोस्ट करत तिच्या चाहत्यांना याविषयी सांगितले आहे.

रिंकूने उन्हाने त्रासले म्हणत तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. रिंकूने चित्रीकरणाच्या दरम्यान हा फोटो काढलेला असून हा फोटो पाहून रिंकू किती थकलेली आहे हे आपल्या लक्षात येत आहे. रिंकूचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. केवळ चार तासांत 20 हजाराहून अधिक लोकांनी हा फोटो सोशल मीडियावर लाईक केला आहे.

सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर काही दिवसांपूर्वी तिचा अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती. या शिवाय रिंकू राजगुरूने काहीच दिवसांपूर्वी लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. तसेच रिंकू झुंड हिंदी चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: rinku rajguru said summer exhausted and share this picture on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.