ठळक मुद्देप्रार्थनाने पतीसोबतचा व्हिडिओ पोस्ट करत पाहा हा रविवारी काय करतो... क्रिकेट... किती रोमँटिक.... असे कॅप्शन लिहिले आहे.

प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने नुकताच तिच्या पतीसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तिचे घर किती सुंदर आहे याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

प्रार्थनाने पतीसोबतचा व्हिडिओ पोस्ट करत पाहा हा रविवारी काय करतो... क्रिकेट... किती रोमँटिक.... असे कॅप्शन लिहिले आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून काहीच तासांत एक लाख 62 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

प्रार्थनाचे लग्न अभिषेक जावकरसोबत झाले आहे. अभिषेक हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. 'डब्बा एैस पैस', 'सॉल्ट आणि प्रेम' यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे.

प्रार्थना लवकरच छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे. यात तिच्यासोबत रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाच्या काही सीन्सचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. त्याचबरोबर ती एका हिंदी वेबसीरिजमध्ये देखील दिसणार आहे. प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली. 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात काम केलं आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: prarthana behere spacious home, see video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.