ठळक मुद्देप्राजक्ताने चक्क बिकनीमध्ये ताल धरला असून तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. हा स्लो मोशन डान्स असून मी हा डान्स करण्याचा प्रयत्न केला आहे असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

अभिनयाची आवड जपत मिळालेल्या संधीच सोनं करत युवा अभिनेत्री प्राजक्ता शिंदे सध्या चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू पाहात आहे. प्राजक्ता शिंदे लवकरच 'इमेल फिमेल’ चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. ती या चित्रपटात अत्यंत बोल्ड अंदाजात दिसणार असून या चित्रपटातील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.

'इमेल फिमेल’ हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्याआधीच प्राजक्ता चांगलीच फेमस झाली आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवरील तिच्या बोल्ड फोटोची चांगलीच चर्चा रंगली होती. तसेच सोशल मीडियावरील तिचे बोल्ड फोटो नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. ती फक्त चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही तितकीच बोल्ड आणि सेक्सी आहे. प्राजक्ता इन्स्टाग्रामवर नेहमीच बोल्ड फोटोज शेअर करत असते. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक बोल्ड व्हिडिओ पोस्ट केला असून या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. प्राजक्ताने चक्क बिकनीमध्ये ताल धरला असून तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. हा स्लो मोशन डान्स असून मी हा डान्स करण्याचा प्रयत्न केला आहे असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. 

'इमेल फिमेल’ मध्ये प्राजक्ता एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेबद्दलबद्दल प्राजक्ताने सांगितले होते की, ‘मी ह्यामध्ये मोनिका या मॉडर्न मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे’. यात माझा बिनधास्त आणि बोल्ड अंदाज रसिकांना पहायला मिळणार आहे. 

प्राजक्ताला बोल्ड, ग्लॅमरस अंदाजात रुपेरी पडद्यावर पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. प्राजक्ता सोबत या चित्रपटात निखिल रत्नपारखी, विक्रम गोखले, विजय पाटकर, दिप्ती भागवत, कांचन पगारे, सुनील गोडबोले, कमलेश सावंत, प्रतीक्षा जाधव, श्वेता परदेशी आणि बालकलाकार मैथिली पटवर्धन या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: prajakta shinde share bold video on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.