मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. तसेच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगितले आहे. तिने सेटवरील फोटो शेअर केला आहे.


प्रार्थना बेहरेने हिंदी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता इंद्रनील सेनगुप्तासोबत मक्याचे कणीस खात असतानाचा फोटो शेअर करत लिहिले की, फॅन गर्ल. इंद्रनील सेनगुप्ता तुझ्यासोबत काम करायला मजा आली. #shootlife #nightshooting #funonset #actorslife #newfilmnewme #hindi #ott #happyme


प्रार्थना बेहरेने हॅशटॅगच्या माध्यमातून ती एका हिंदी चित्रपटासाठी शूट करत असल्याचे सांगितला. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आहे. या चित्रपटाचे शूटिंग रात्री पार पडले. तिने या प्रोजेक्टमध्ये काम करत असल्यामुळे आनंदी असल्याचे सांगितले आहे. प्रार्थनाने या चित्रपटाच्या टायटल आणि रिलीजबद्दल अद्याप काहीही सांगितले नाही.


आजवर प्रार्थनाने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र सिनेमांची निवड करताना प्रार्थना सध्या विचारपूर्वक निर्णय घेते. चित्रपटसृष्टीत एंट्री करताना वाट्याला आलेले चित्रपट तिने पटापट निवडले. यावेळी स्क्रीप्ट काय, दिग्दर्शक कोण, कलाकार कोण, भूमिका काय, निर्माता कोण असा विचार कधीच केला नसल्याचे तिने दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.मात्र आता सिनेमांची निवड करताना विचारपूर्वक निर्णय घेते असं प्रार्थनाने म्हटलं होते.


प्रार्थनाने याआधी 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. 
'कॉफी आणि बरंच काही', 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी', 'व्हॉट्स अॅप लग्न' अशा सिनेमांमधून प्रार्थनाने आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण केले आहे. रुपेरी पडद्यावर मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसह प्रार्थना बेहरेची केमिस्ट्री चांगलीच जुळली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Marathi actress Prarthana Behera will be seen in a Hindi film with this actor for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.