marathi actor sandeep pathak tweet about vaccination in maharashtra | कोरोना लसींवरचे राजकारण थांबवा म्हणत या मराठी अभिनेत्याने केले ट्वीट

कोरोना लसींवरचे राजकारण थांबवा म्हणत या मराठी अभिनेत्याने केले ट्वीट

ठळक मुद्देकोरोना लसीसारख्या गोष्टीवर राजकारण करू नका म्हणत अभिनेता संदीप पाठकने सोशल मीडियावर ट्वीट केले आहे.

महाराष्ट्रात सध्या कोरोना लसींचा तुटवडा आहे. त्यामुळे राज्य सरकार लसींची केंद्र सरकारकडे मागणी करत आहे. सध्या या मुद्द्यावरून महाराष्ट्रात चांगलेच राजकारण तापले आहे. पण कोरोना लसीसारख्या गोष्टीवर राजकारण करू नका म्हणत अभिनेता संदीप पाठकने सोशल मीडियावर ट्वीट केले आहे.

संदीपने ट्वीट केले आहे की, देशात सगळ्यात जास्त महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढत असताना इतर राज्यांना लस पुरवठा मोठ्या प्रमाणात का? पक्ष, राजकारण ह्यांच्या वादात सामान्य माणूस कोरोनाग्रस्त होतोय. आपण माणसाच्या जीवाशी खेळतोय ह्याचं भान सर्व राजकीय पक्षांनी असु द्यावं... यासोबत त्याने #MaharashtraNeedsVaccine असे देखील आणखी एक ट्वीट केले आहे.

संदीपचे हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झाले असून संदीपचे मत योग्यच आहे असे नेटिझन्स त्याला सोशल मीडियावरून सांगत आहेत. परखडपणे आवाज उठवल्याबद्दल धन्यवाद... आजकाल काहींना हे देखील जमत नाही.... असे म्हणत एकाने या ट्वीटला रिप्लाय दिला आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: marathi actor sandeep pathak tweet about vaccination in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.