ठळक मुद्देजितेंद्रने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्यात लिहिले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात सुद्धा दिवसागणिक वाढत चालला आहे. या रोगाला आळा घालण्यासाठी सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत.

कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत असल्याने महाराष्ट्र सरकारने काही निर्बंध लावले आहेत. महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार अशी काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. पण लॉकडाऊन न लावता काही गोष्टी बंद करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील मॉल, मल्टीप्लेक्स बंद करण्यात आले आहेत. याचा फटका अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांना बसला आहे.

एप्रिल महिन्यात काही मराठी आणि हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार होते. पण आता मल्टीप्लेक्स बंद असल्याने या चित्रपटांची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. अभिनेता जितेंद्र जोशीच्या चित्रपटाला देखील या गोष्टीचा फटका बसला आहे. त्याने सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे.

जितेंद्रने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्यात लिहिले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात सुद्धा दिवसागणिक वाढत चालला आहे. या रोगाला आळा घालण्यासाठी सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. शेकडो लोकांच्या प्रेमाने, आशीर्वादाने आणि मेहनतीने बनलेला 'गोदावरी' हा आपला चित्रपट येत्या महाराष्ट्रदिनाच्या पूर्व संध्येला म्हणजेच 30 एप्रिल 2021 रोजी आपल्या सर्वांच्या भेटीस आम्ही चित्रपटगृहांमध्ये घेऊन येणार होतो. कारण या चित्रपटाचा अस्सल आनंद हा मोठ्या पडद्यावरच पाहून घेता येईल, अशी आमची खात्री होती आणि आहेच. परंतु बदलती परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही सामोपचाराने 'गोदावरी'चे प्रदर्शन तूर्तास पुढे नेण्याचा निर्णय घेत आहोत. परिस्थतीमध्ये सुधारणा होऊन सर्व काही आलबेल होताच आम्ही प्रदर्शनाची नवीन तारीख लवकरच जाहीर करू.

तोवर, आपण स्वतःची आणि आपल्या आप्त स्वकियांची काळजी घ्यावी व अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं आणि सर्वांच्या आरोग्य सुरक्षेकरीता मास्क नक्की वापरावेत ही कळकळीची विनंती.

खळखळ वाहणारी तुमची-आमची 'गोदावरी' लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. फक्त चित्रपटगृहांमध्येच! आपलं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या!
जय महाराष्ट्र!!! जय हिंद!

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: jitendra joshi godavari marathi movie got postponed due to corona virus situation in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.