ठळक मुद्देअभिनेत्री ऋता दुर्गुळे आता टाईमपास ३ या चित्रपटात झळकणार आहे. ऋताने दुर्वा , फुलपाखरू यांसारख्या मालिकेत मुख्य भूमिका साकारली आहे.

केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब यांची मुख्य भूमिका असलेल्या टाईमपास या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगली कमाई केली होती. या चित्रपटाची कथा, चित्रपटाची गाणी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. त्यानंतर प्रेक्षकांना काही वर्षांनी टाईमपास २ हा चित्रपट पाहायला मिळाला. या चित्रपटात प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. तसेच प्रियदर्शन आणि प्रियाच्या केमिस्ट्रीची देखील चर्चा झाली होती. 

आता प्रेक्षकांना टाईमपास ३ पाहायला मिळणार आहे. रवी जाधव यांनी काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर बदाम तिर्रीचे पान शेअर केले होते. तेव्हापासून टाईमपास ३ प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा रंगली आहे. टाईमपास ३ साठी अनेक संहिता रवी यांच्याकडे आल्या असून त्यांनी त्यातून एका संहितेची निवड केली असल्याचे म्हटले जात आहे आणि आता तर टाईमपास या चित्रपटात एका अभिनेत्रीची वर्णी लागली असल्याची चर्चा आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री ऋता दुर्गुळे आता टाईमपास ३ या चित्रपटात झळकणार आहे. ऋताने दुर्वा , फुलपाखरू यांसारख्या मालिकेत मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच सिंगिग स्टार या रिॲलिटी शो मध्ये देखील ती झळकली होती. स्ट्रॉबेरी शेक सारखी एक वेगळी शॉर्ट फिल्म आणि दादा एक गुड न्यूज आहे या नाटकात देखील तिने काम केले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: hruta durgule will play main role in timepass 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.