ठळक मुद्देअनिकेत विश्वासराव व स्नेहा चव्हाण यांचा हळदीचा कार्यक्रम पार पडलाअनिकेत विश्वासराव व स्नेहा चव्हाण झळकले होते हृद्यात समथिंग समथिंग चित्रपटात


सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत असताना आता मराठी सिनेसृष्टीतील एक जोडी लग्नबेडीत अडकणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणजेच अभिनेता अनिकेत विश्वासराव व अभिनेत्री स्नेहा चव्हाण आज विवाहबंधनात अडकणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी गुलदस्त्यात ठेवली आहे. मात्र स्नेहा चव्हाणने हळदीचे व मेंहदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 


अभिनेता अनिकेत विश्वासराव व अभिनेत्री स्नेहा चव्हाण आज लग्नबेडीत अडकणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. हा विवाह सोहळा कुटुंब, जवळचे नातेवाईक व इंडस्ट्रीतील काही निवडक मित्रमैत्रिणींच्या उपस्थित पार पडणार आहे. हा विवाहसोहळा कुठे होतो आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. त्यांचे शनिवारी व रविवारी मेंहदी व हळद सेरेमनी पार पडली. या सेरेमनीचे फोटो खुद्द स्नेहाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 


अनिकेत व स्नेहा हृद्यात समथिंग समथिंग या चित्रपटात एकत्र झळकले होते.

या दोघांचा ५ ऑगस्टला पुण्यातील हिंजवडी येथे साखरपुडा संपन्न झाला होता. हा साखरपुडा देखील कोणताही गाजावाजात न करता केला होता. त्यावेळी याबाबत स्नेहाला विचारले असता ती म्हणाली की, आमचे अरेंज मॅरेज आहे. आमचे अफेयर वगैरे काहीच नव्हते. तसेच आम्ही एकमेकांना डेटदेखील केले नव्हते. आमच्या लग्नाबाबतचे जून महिन्यात ठरले. आम्ही एक चित्रपट नुकताच एकत्र केला. त्यापूर्वी आम्ही एकमेकांना फक्त ओळखत होतो. तेव्हा आम्ही सहकलाकार व फ्रेंड्स इतकेच नाते आमच्यात होते. माझ्या घरातले माझ्यासाठी जानेवारीपासून मुलगा शोधत होते. अनिकेतची मावशी आमच्या सोसायटीत राहते. तर मावशी व आई मैत्रीणी असल्यामुळे त्यांचे यासंदर्भात बोलणे झाले. मावशीने माझा अनिकेत नामक पुतण्या आहे. त्याच्यासाठीदेखील मुलगी बघत आहेत. त्याच्याशी बोलून पाहू का? आणि अशाप्रकारे आमच्या लग्नाबाबतचे असे अचानकच ठरले. माझी व त्याची आई एकमेकांशी बोलले. मग, आम्ही दोघे फोनवर बोललो. आम्ही विचार केला की अनोळखी व्यक्तीबरोबर लग्न करण्यापेक्षा आपण एकमेकांना ओळखतो व एकाच क्षेत्रातील आहोत तर लाइफ पार्टनर म्हणून एकमेकांचा विचार नक्कीच करू शकतो.


आता या दोघांच्या लग्नातील फोटो कधी पाहायला मिळताहेत, याची चाहते वाट पाहत आहेत. 

Web Title: Exclusive: Aniket Vishwasrao gets married today with this actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.