digpal lanjekar's farzand movie editor pramod kahar died due to corona | दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरवर कोसळला दुःखाचा डोंगर, कोरोनामुळे गमावला जवळचा व्यक्ती

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरवर कोसळला दुःखाचा डोंगर, कोरोनामुळे गमावला जवळचा व्यक्ती

ठळक मुद्देप्रमोद कहर यांनी फर्जंद, फत्तेशिकस्त सारख्या चित्रपटांचे संकलन केले होते. या दोन्ही चित्रपटाच्या संकलनाचे चांगलेच कौतुक झाले होते.

दिग्पाल लांजेकरला फर्जंद या चित्रपटामुळे खरी ओळख मिळाली. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे सगळ्यांनीच कौतुक केले होते. या चित्रपटाच्या यशात त्याच्या टीमचा तितकाच वाटा होता. या चित्रपटाचे संकलन देखील खूपच छान झाले होते. या चित्रपटाचे संकलन प्रमोद कहर यांनी केले होते. प्रमोद यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले आहे.

Posted by Prashant Masurkar on Friday, April 9, 2021

प्रमोद कहर यांनी फर्जंद, फत्तेशिकस्त सारख्या चित्रपटांचे संकलन केले होते. या दोन्ही चित्रपटाच्या संकलनाचे चांगलेच कौतुक झाले होते. मराठीतील आघाडीच्या संकलकांपैकी आज त्यांची गणना केली जात होती. पण त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार देखील सुरू होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रमोद कहर दिग्पाल लांजेकरच्या पावनखिंड या आगामी चित्रपटावर काम करत होते. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दिग्पालसोबतच पावनखिंड, फर्जंद, फत्तेशिकस्त या चित्रपटातील सगळ्याच कलाकार, तंत्रज्ञ यांना त्यांच्या निधनामुळे धक्का बसला आहे. 

इंद्रजिमी जृंभ पर बाडव सअंभ पर रावण सदंभ पर रघुकुलराज है। तेज तमअंस पर कान्ह जिमि कंस पर त्यों म्लेंछ बंस पर *'शेर शिवराज है।'* पुष्प चौथे... फेब्रुवारी 2022..

Posted by Pramod Kahar on Thursday, February 18, 2021

प्रमोद यांनी 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या मोनिश पवार दिग्दर्शित 'धोंडी' या चित्रपटाचे देखील संकलन केले होते. प्रमोद हे मुळचे पुण्याचे होते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: digpal lanjekar's farzand movie editor pramod kahar died due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.