'सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरु हिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. इतकंच नाही तर 'सैराट' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. एका रात्रीत रिंकू महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिलं नाही. या चित्रपटानंतर रिंकू राजगुरूचा फॅन फॉलोव्हिंगदेखील चांगलाच वाढला. रिंकू सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिथून चाहत्यांशी संवाद साधत असते. रिंकूने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यातून तिने लंडनला असल्याचे सांगितले होते. ती लंडनला का गेली आहे, हे समजू शकलेले नव्हते. मात्र आता अशी माहिती समोर आली आहे की रिंकू राजगुरू लंडनमध्ये मराठी चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेली आहे.


टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, रिंकू राजगुरू लंडनमध्ये छूमंतर या मराठी चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी गेली. या चित्रपटात तिच्यासोबत प्रार्थना बेहरे आणि सुव्रत जोशी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत.


ईटाइम्सला प्रार्थना बेहरेने सांगितले की, जवळपास सहा महिन्यांहून जास्त लॉकडाउननंतर कामाला सुरूवात केल्यामुळे मी खूप आनंदी आहे. मला वाटतं की छूमंतर हा पहिला मराठी चित्रपट आहे ज्याचे परदेशात शूटिंग सुरू झाले आहे. त्यामुळे आम्ही खूप उत्सुक आहोत.

प्रार्थना पुढे म्हणाली की, सुव्रत जोशी आणि रिंकू राजगुरू लवकरच शूटिंगला सुरूवात करतील. यापूर्वी मी रिंकूसोबत काम केलेले नाही. आमचा पहिला मराठी चित्रपट आहे, ज्यात आम्ही काम करतोय.


रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहरे आणि सुव्रत जोशी यांना एकत्र रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Confirm! Rinku Rajguru is shooting for 'Chhumantar' in London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.