​मराठीत बालचित्रपटांची मांदियाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2016 04:22 PM2016-02-23T16:22:34+5:302016-02-23T09:22:34+5:30

चित्रपट इंडस्ट्रीमध्ये एक प्रकारचा सिनेमा हीट झाला की त्यासारखे अनेक चित्रपट येतात. काही वर्षांपूर्वी ‘शाळा’ चित्रपटाच्या नेत्रदीपक यशामुळे बालचित्रपटांचा ...

Cinematography in Marathi | ​मराठीत बालचित्रपटांची मांदियाळी

​मराठीत बालचित्रपटांची मांदियाळी

googlenewsNext
त्रपट इंडस्ट्रीमध्ये एक प्रकारचा सिनेमा हीट झाला की त्यासारखे अनेक चित्रपट येतात. काही वर्षांपूर्वी ‘शाळा’ चित्रपटाच्या नेत्रदीपक यशामुळे बालचित्रपटांचा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ट्रेंंडच आला आहे असे म्हणावे लागेल.

एलिझाबेथ एकादशी, सिद्धांत, बालक पालक, अवताराची गोष्ट, किल्ला अशी अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. आगामी काळात या लिस्टमध्ये आणखी काही नावे जोडली जाणार आहेत.

‘कौल मनाचा’ या चित्रपटात बोर्डिंग शाळेत मुलांना येणारे अनुभव आणि कुटुंबापासून दूर राहताना होणारी मनाची घालमेल दाखविणात येणार आहे. नुकतीच त्याची शूटिंग पूर्ण झाली आहे.

kaul manacha

कचरा/भंगार गोळा करून कशीबशी पोटाची खळगी भरणाºया मुलांवर आधारित ‘हाफ टिकट’ हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. 

half ticket

‘श्यामची शाळा’मध्ये गरीब बांधकाम कामगारांच्या मुलांना शिकण्यासाठी कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते याची कथा मांडण्यात आली आहे.

shamchi shaala

आगामी मराठीतील पहिलीवहिली सायन्स फिक्शन फिल्म ‘फुंतरू’सुद्धा कुमारवयीन कॉलेज विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित आहे.

phuntroo

यावरून तर हे स्पष्ट होते की, पुढील काही महिन्यात आपल्याला अनेक बालचित्रपट पाहायला मिळणार आहेत.

Web Title: Cinematography in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.