एखाद्या अभिनेत्रीइतकी सुंदर आहे अंशुमन विचारेची पत्नी, पाहा तिचे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 05:02 PM2021-06-09T17:02:25+5:302021-06-09T17:07:22+5:30

अंशुमन सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याच्या कुटुंबियांचे अनेक फोटो तो पोस्ट करत असतो.

anshuman vichare wife pictures | एखाद्या अभिनेत्रीइतकी सुंदर आहे अंशुमन विचारेची पत्नी, पाहा तिचे फोटो

एखाद्या अभिनेत्रीइतकी सुंदर आहे अंशुमन विचारेची पत्नी, पाहा तिचे फोटो

Next
ठळक मुद्दे त्याची पत्नी ही अतिशय सुंदर असून तिचे अनेक फोटो त्याच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर पाहायला मिळतात. 

एकांकिकांमधून घडलेला अंशुमन विचारे आज नाटक आणि सिनेमा क्षेत्रात उत्तम स्थिरावला आहे. 'श्वास', 'पोस्टर बॉईज', 'स्वराज्य', 'विठ्ठला शप्पथ' अशा अनेक मराठी सिनेमांंमध्ये अंशुमन विचारेने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मोर्चा या सिनेमाद्वारे त्याने गायनाच्या क्षेत्रात देखील प्रवेश केलेला आहे.

अंशुमन सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याच्या कुटुंबियांचे अनेक फोटो तो पोस्ट करत असतो. त्याची पत्नी ही अतिशय सुंदर असून तिचे अनेक फोटो त्याच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर पाहायला मिळतात. 

अंशुमनची चिमुकली लेक अन्वी सोशल मीडियावर चांगलीच फेमस आहे. अन्वीचे एक ना अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर काही महिन्यांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता. आई मी तुला म्हातारी होऊच देणार नाही, असे या व्हिडिओतील आईसाठीचे अन्वीचे बोबडे बोल मनाला स्पर्शून गेले होते.

या व्हिडीओत अन्वी आणि तिच्या आईचा संवाद आपल्याला पाहायला मिळाला होता. अन्वी या व्हिडिओत तिच्या आईसाठी जेवण बनवताना दिसते. याचदरम्यान मायलेकींचा संवाद सुरू होतो. तू बनवलं माझ्यासाठी जेवायला? असे आई म्हणते. यावर हो, असे अन्वी म्हणते. तू माझी काळजी घेणार मम्मा? माझे लाड करणार? मी म्हातारी झाल्यावर मला सांभाळणार?, अशी आई अन्वीला विचारते. यावर तू म्हातारी होणार मग मी घाबरणार, कारण मी म्हातारीला घाबरते. मी तुला म्हातारी होऊच नाही देणार, कारण तू माझी मम्मा आहे आणि तू सुंदर दिसतेस. आता मी साबुदाण्याची खिचडी करते, असे अन्वी म्हणते. लेकीच्या तोंडचे शब्द ऐकून आई तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना या व्हिडिओत दिसते.


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: anshuman vichare wife pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app