Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 13:30 IST2025-12-26T13:29:05+5:302025-12-26T13:30:56+5:30

Malegaon Municipal Corporation Election : राज्यात दोन्ही ठाकरे बंधूची युती झाली आणि संपूर्ण राज्यात त्यांच्या समर्थकांचा जल्लोष झाला, मालेगाव येथे देखील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला असला, तरी नजरेत भरणारा जल्लोष मात्र कुठे दिसला नाही.

Malegaon Municipal Corporation Election Thackeray brothers formed an alliance; How much influence do they have in Malegaon Municipality? | Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता

Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता

मालेगाव - राज्यात दोन्ही ठाकरे बंधूची युती झाली आणि संपूर्ण राज्यात त्यांच्या समर्थकांचा जल्लोष झाला, मालेगाव येथे देखील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला असला, तरी नजरेत भरणारा जल्लोष मात्र कुठे दिसला नाही. पालिका निवडणुकीच्या निमित्ताने उभयतांच्या युतीला महत्त्व असल्याने महापालिकांमध्ये या दोन्ही पक्षांचा किती लाभ होणार, याची चर्चा सर्वत्र सुरू झाली असून, मालेगावला या दोन्ही पक्षांचा प्रभाव कसा राहिल, याबाबत राजकीय गोटात अंदाज बांधले जात आहेत.

राज्यात बुधवारी उद्धवसेना व मनसे एकत्र येत त्यांनी युतीची घोषणा केली. त्यामुळे दोन्ही पक्षांतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. असे असले, तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या भेटीगाठी घेऊन एकमेकांना शुभेच्छा देऊन हा आनंद साजरा केला. या युतीमुळे इतर महानगरपालिका निवडणुकांवर प्रभाव पडणार असला, तरी मात्र शहराच्या राजकारणावर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता कमीच असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. तर, दुसरीकडे मात्र कार्यकर्त्यांमध्ये आशेचे किरण निर्माण झाल्याचे देखील दिसत आहे.

मनसे, उद्धवसेना युतीमुळे महापालिका निवडणुकांवर युतीचा प्रभाव पडणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. असे असले, सध्याचे राजकीय वातावरण पाहता या दोन्ही पक्षांना स्थानिक पातळीवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते कितपत जनतेपर्यंत पोहचतात यावर त्यांची कामगिरी ठरणार असल्याचे सध्या तरी दिसत आहे.

मनसेचे एकदाच दोन नगरसेवक

  • मनसेची स्थापना झाल्यापासून २०२६ ची निवडणूक ही तिसरी आहे. यापूर्वी झालेल्या दोन निवडणुकीत मनसेला फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे.
  • त्यावेळी म्हणजे २०१२ साली झालेल्या मनपा निवडणुकीत सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मनसे निवडणूक रिंगणात होते. त्यावेळी गायकवाड यांच्यासह आणखी एक, असे दोन नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर गायकवाड हे पक्षातून बाहेर पडले होते.
  • त्यामुळे २०१७ साली झालेल्या मनपा निवडणुकीत विजयी उमेदवारात मनसेबा नगरसेवक नव्हता. त्यामुळे आगामी निवडणुकीतून पुन्हा मनसे मनपात प्रवेश करेल का?, या प्रश्नाचे उत्तर निवडणूक निकालानंतर मिळेल.

 

उद्धवसेनेची पहिलीच निवडणूक

२०२१ साली झालेल्या राजकीय उलथापालथीत तत्कालीन शिवसेनेचे दोन गट झाले असून, एक उद्धवसेना व दुसरी शिंदेसेना, अशा दोन भागांचा समावेश आहे. त्यामुळे ही मनपा निवडणूक उद्धवसेनेची पहिलीच निवडणूक ठरणार आहे. त्यात सेनेचे उपनेते अद्वय हिरे यांनी सेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांचा जनाधार काहीसा कमी झाला आहे.

तत्कालीन सेनेकडे १२ जागा

२०१७ मध्ये झालेल्या मनपा निवडणूक स्वतंत्रपणे लढवत तत्कालीन शिवसेनेने १२ जागांवर विजय मिळविला होता. त्यानंतरच्या सत्ता स्थापनेत त्यांनी ऐनवेळी काँग्रेसशी युती करून उपमहापौर पद पदरात पाडून घेतले होते. सेनेच्या दोघांना त्यावेळी संधी मिळाली.

Web Title : ठाकरे बंधु एकजुट: मालेगांव नगर निगम चुनाव पर क्या प्रभाव?

Web Summary : उद्धव सेना और मनसे गठबंधन से मालेगांव में चर्चा। पिछला प्रदर्शन सीमित प्रभाव दिखाता है, लेकिन कार्यकर्ताओं में उम्मीद जगी। स्थानीय पहुंच सफलता के लिए महत्वपूर्ण।

Web Title : Thackeray Brothers Unite: Impact on Malegaon Municipal Corporation Elections?

Web Summary : Uddhav Sena and MNS alliance sparks Malegaon buzz. Past performance suggests limited impact, but hope flickers among workers. Local outreach crucial for success.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.