अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 05:57 IST2024-10-23T05:57:15+5:302024-10-23T05:57:46+5:30

शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे चिन्ह गाेठविण्याची मागणी करणारी याचिका

Will Ajit Pawar led NCP get the clock symbol The hearing will be held on Thursday | अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी

अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत घड्याळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक चिन्ह गाेठविण्याची मागणी करणारी याचिका शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. त्यावर २४ ऑक्टाेबरला सुनावणी हाेणार आहे.

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २९ ऑक्टाेबर ही अखेरची तारीख आहे. त्यापूर्वी निर्णय घेण्याची विनंती शरद पवार गटाने केली. त्यावर, यापूर्वी आदेश दिल्याचे न्यायालयाने म्हटले. तर अजित पवार गटाच्या वकिलांनी काही उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचे सांगितले. निवडणूक आयाेगाने लाेकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला घड्याळ चिन्हाचे वाटप केले हाेते.

Web Title: Will Ajit Pawar led NCP get the clock symbol The hearing will be held on Thursday