त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 17:30 IST2024-11-16T17:29:30+5:302024-11-16T17:30:58+5:30
Eknath Shinde Uddhav Thackeray News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कोकणातील प्रचारसभेतून हल्ला चढवला.

त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
Eknath Shinde Uddhav Thackeray News: 'अरे मुख्यमंत्री राहिलेला माणूस काय बोलतोय? याचा विचार केला पाहिजे', असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅगा तपासल्याच्या मुद्द्यावरून शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं.
योगेश कदम यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दापोलीत प्रचारसभा झाली. या सभेतून शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. तुमचे सगळे बालेकिल्ले आणि गड जनतेने उद्ध्वस्त करून टाकले, असे शिंदे ठाकरेंना म्हणाले.
"कोकणाने तुम्हाला धुडकारलं. कोकण बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या मागे उभं राहिले. तुम्ही (उद्धव ठाकरे) म्हणाल, कोकण आमचा बाल्लेकिल्ला. ठाणे आमचा बालेकिल्ला. संभाजीनगर आमचा बालेकिल्ला. तुमचे सगळे बालेकिल्ले आणि गड जनतेने उद्ध्वस्त करून टाकले. शिवसेना आणि धनुष्यबाणाला मतदान केलं", असा वार शिंदेंनी ठाकरेंवर केला.
"तुमचा (उद्धव ठाकरे) बॅग तपासल्यावर, कुठला आहेस? बॅग उघडा, तुला नंतर उघडतो. तुझं बघतो. अपॉईमेंट लेटर काय? अपॉईमेंट लेटर खिशात घेऊन फिरतात का? अरे मुख्यमंत्री राहिलेला माणूस काय बोलतोय? याचा तर विचार केला पाहिजे. आम्हाला माहितीये बॅगांमध्ये काही नसतं. कारण त्यांना बॅगा पुरत नाहीत, त्यांना खोके पुरत नाहीत; त्यांना कंटेनर लागतो. हे मी म्हणालो नाही, राज ठाकरे म्हणाले", असे म्हणत शिंदेंनी ठाकरेंना बॅगा तपासल्याच्या मुद्द्यावरून डिवचलं.