एकनाथ शिंदेंची जोरदार मुसंडी; एकट्याने ठाकरे, पवार, कांग्रेसपेक्षा जास्त जागांवर घेतली आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 14:22 IST2024-11-23T14:21:52+5:302024-11-23T14:22:30+5:30
उद्ध ठाकरे, शरद पवार अन् काँग्रेसपेक्षा एकनाथ शिंदे ठरले वरचड.

एकनाथ शिंदेंची जोरदार मुसंडी; एकट्याने ठाकरे, पवार, कांग्रेसपेक्षा जास्त जागांवर घेतली आघाडी
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाने सर्वानाच चकीत केले आहे. भाजपसह महायुतीने न भूतो न भविष्यती असे यश मिळवले आहे. खासकरुन एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाने तर जोरदार मुसंडी मारलेली पाहायला मिळत आहे. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिघांनीही 288 जागांपैकी 220 जागांवर आघाडी मिळवली आहे.
20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व 288 जागांसाठी एकाच वेळी मतदान झाले होते. येथे सत्ताधारी महाआघाडीचा भाग असलेल्या भाजपने 149 जागा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 81 आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने 59 जागा लढवल्या होत्या. तर, MVA मध्ये समाविष्ट असलेल्या काँग्रेसने 101, शिवसेना (उबाठा) 95 आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) 86 जागांवर निवडणूक लढवली.
यंदाच्या निवडणुकीत काँग्रेससह मविआची सर्वात खराब कामगिरी पाहायला मिळत आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार शिवसेना (उबाठा) 19 जागांवर आघाडीवर आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी 13 जागा आणि काँग्रेस 19 जागांवर आघाडीवर आहे. तर, इतर उमेदवार 4 जागांवर आघाडीवर आहेत. एकूणच मविआ महाराष्ट्रात 55 जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांची शिवसेना 55 जागांवर एकहाती आघाडीवर आहे. अशाप्रकारे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या बरोबरीने किंवा जास्त जागा एकनाथ शिंदेंच्या पक्षाला मिळत आहेत.
तर, महायुतीचा विचार केला, तर भाजपला 128-130, शिंदेसेनेला 55-58 आणि अजित पवार गटाला 38-40 जागा मिळत आहेत. अशाप्रकारेच महायुतीने आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी केली आहे. हाच कल संध्याकाळपर्यंत कायम राहिल्यास, महायुतीचा हा सर्वात मोठा