राहुल गांधींना पंतप्रधानपद नाही, पण 'हे' पद नक्की मिळेल; आठवलेंची भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 19:05 IST2019-04-03T19:04:50+5:302019-04-03T19:05:11+5:30

प्रकाश आंबेडकर यांची आघाडी कांग्रेसला नाही तर भाजपाच्या फायद्याची असल्याचा आरोपही त्यांनी नुकताच केला होता. 

Rahul Gandhi will not Prime Minister but will get the 'this' post: Ramdas Athavle | राहुल गांधींना पंतप्रधानपद नाही, पण 'हे' पद नक्की मिळेल; आठवलेंची भविष्यवाणी

राहुल गांधींना पंतप्रधानपद नाही, पण 'हे' पद नक्की मिळेल; आठवलेंची भविष्यवाणी

सातारा : महायुतीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार ठरले आहेत. पण महाआघाडीचे उमेदवार कोण असा सवाल केला जात आहे. मात्र, राहुल गांधी यांनी वेळोवेळी पंतप्रधान पदाचे दावेदार असल्याचे वृत्त फेटाळले आहे. यावर रिपाईचे नेते आणि राज्यसभेचे खासदार रामदास आठवले यांनी भविष्यवाणी केली आहे. राहुल गांधींना पंतप्रधानपद मिळणार नाही, पण कॅबिनेट दर्जाचे पद नक्की मिळेल असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

आठवले साताऱ्यात बोलत होते. मोदी आणि मी जोपर्यंत एकत्र आहोत, तोपर्यंत काँग्रेस विरोधात राहील. विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा आहे. ते पद राहुल गांधी यांना नक्की मिळेल, असा टोला रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत लगावला.

वंचीत आघाडी सारखे अनेक प्रयोग मी करून बसलो आहे, त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचा प्रयोग यशस्वी होणार नाही, उलट त्याचा फायदा युतीलाच होईल, असेही ते म्हणाले. 

प्रकाश आंबेडकर यांची आघाडी कांग्रेसला नाही तर भाजपाच्या फायद्याची असल्याचा आरोपही त्यांनी नुकताच केला होता. 

Web Title: Rahul Gandhi will not Prime Minister but will get the 'this' post: Ramdas Athavle