पुणे निवडणूक 2019 : धनंजय मुंडें बाबत जे काही घडलं ते राजकीय षडयंत्र! परळी येथील वादाबाबत अजित पवार यांची शंका 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 12:08 PM2019-10-21T12:08:10+5:302019-10-21T15:54:34+5:30

Pune Vidhan Sabha Election 2019 : मुद्दाम काही क्लीप व्हायरल करुन मतदारांना खेचण्यासाठी डाव आहे.

Pune Vidhan Sabha Election 2019 : Political conspiracy whatever happened Dhananjay munde ? Ajit Pawar doubts about the dispute in Parli | पुणे निवडणूक 2019 : धनंजय मुंडें बाबत जे काही घडलं ते राजकीय षडयंत्र! परळी येथील वादाबाबत अजित पवार यांची शंका 

पुणे निवडणूक 2019 : धनंजय मुंडें बाबत जे काही घडलं ते राजकीय षडयंत्र! परळी येथील वादाबाबत अजित पवार यांची शंका 

Next
ठळक मुद्देकाटेवाडी येथे सहकुटुंब केले मतदानक्लिपची लॅब कडुन तपासणी करुन शहानिशा होणे गरजेचे

बारामती : ते राजकीय षडयंत्र आहे का, मुद्दाम काही क्लीप व्हायरल करुन मतदारांना खेचण्यासाठी डाव आहे.याबाबत संबंधित क्लीपची लॅबमध्ये तपासणी  करावी.याचा कोणत्याची पक्षाच्या नेत्यांनी  राजकीय फायदा कोणी घेवु नये. या  वादाबदद्ल कालच धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क झाला.त्यांनी कोणाच्या भावना दुखावल्या जातील,असे कृत्य माज्याकडुन झाले नसल्याचे सांगितले.ती क्लीप कट केलेली असल्याचे देखील धनंंजय यांचे म्हणले आहे.त्यामुळे त्या क्लिपची लॅब कडुन तपासणी करुन शहानिशा होणे गरजेचे आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार , आई आशाताई पवार, बंधु श्रीनिवास पवार, भावजय शर्मिला पवार,बहिण नीता पाटील,पुत्र जय पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज सकाळी सात वाजता मतदानाचा हक्क बजावला.मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी परळी येथील मुंडे बंधु भगिनींच्या वादाच्या पार्श्वभुमीवर हे मत व्यक्त केले. यावेळी पवार म्हणाले,निवडणुकीच्या निमित्ताने असे मुद्दे पुढे येवु नयेत. गटबाजीतुन अशा घटना घडतात. मात्र, हा मुद्दा किती ताणायचा,त्याचा फायदा कोणी घेवु नये. ते मतदार केंद्र संवेदनशील आहे.दोघांचेही कार्यकर्ते संवेदनशील आहेत.शेवटी निवडणुक येतात,जातात.पाच वषार्तुन एकदा निवडणुका येतात.मात्र, रक्ताची नाती कायम असतात. धनंजय ला मी चांगले ओळखतो. त्याने असे काही घडले असते,तर मला स्पष्ट सांगितले असते,हे सांगायला पवार विसरले नाहित.


ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळाला.वय वर्ष ७९ असताना उन वारा पावसाची त्यांनी तमा बाळगली नाही. विशेषत : तरुणांचा त्यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद  मिळाला.साताºयासह बारामती  येथील सभांना पाऊस असताना लोकांचा प्रचंड उत्साह होता. काही नेत्यांना पाऊस नसताना,मंडप टाकलेला नसताना चार चार पाच पाच तास थांबावे लागते. सभेला लोक गोळा होण्याची वाट पाहताना त्यांच्या कार्यकर्त्यांना ह्यसाहेब चहा घ्या,याच्याशी बोला,त्याच्याशी बोला,असे करुन नेत्यांना थांबुन घ्यावे लागते.मात्र, साहेबांबाबत ते घडले नाहि.त्यांच्या सभा ऐकण्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहत होते.यामध्ये तरुणांचा मोठा सहभाग होता,असा टोला पवार यांनी भाजपच्या नेत्यांना त्यांचे नाव न घेता लगावला.
चाळीस वर्षात प्रथमच हा पाऊस पाहत आहे.मतदारांनी उत्साह दाखविल्यास मतदानाची टक्केवारी वाढेल. पहिल्यांदाच असे वातावरण तयार झाल्याचे पवार म्हणाले.

Web Title: Pune Vidhan Sabha Election 2019 : Political conspiracy whatever happened Dhananjay munde ? Ajit Pawar doubts about the dispute in Parli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.