'ओव्हर कॉन्फिडन्समुळे अनेकांचा घात'; खासदारांचे तिकीट कापल्यानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 04:40 PM2024-04-06T16:40:03+5:302024-04-06T16:40:26+5:30

CM Eknath Shinde To Shivsena Leaders: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नेत्यांना बैठकीत संबोधित केले. यावेळी त्यांनी तिकीट नाकारले तरी कुणावरही अन्याय होणार नाही असे आश्वासन खासदारांना व इच्छुकांना दिले आहे.

'Overconfidence kills many'; Eknath Shinde's big claim after cutting MP's ticket in Maharashtra Loksabha Shivsena Election 2024 politics | 'ओव्हर कॉन्फिडन्समुळे अनेकांचा घात'; खासदारांचे तिकीट कापल्यानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

'ओव्हर कॉन्फिडन्समुळे अनेकांचा घात'; खासदारांचे तिकीट कापल्यानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या खासदारांचे तिकीट कापल्याने शिवसेनेच्या खासदार, आमदार, पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. यामुळे ठाकरे गट देखील शिंदेंवर टीका करत सुटला आहे. श्रीकांत शिंदे यांच्याही उमेदवारीला भाजपाचा विरोध असल्याने त्यांचीही उमेदवारी आज अखेरपर्यंत जाहीर झाली नव्हती. यावर आता एकनाथ शिंदे यांनी मौन सोडले आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नेत्यांना बैठकीत संबोधित केले. यावेळी त्यांनी तिकीट नाकारले तरी कुणावरही अन्याय होणार नाही असे आश्वासन खासदारांना व इच्छुकांना दिले आहे. बाबूराव कदम या सर्वसामान्य गरीब कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्याने राज्यात चांगला मेसेज गेला आहे. हिंगोलीमधील उमेदवार चांगला आहे. त्यांच्या वडिलांनी चांगली कामे केली आहेत, असे स्पष्टीकरण शिंदे यांनी दिले. 

शिवसेनेला १०० टक्के स्ट्राईक रेट ठेवायचा आहे. निवडणुकीत एक एक मत महत्वाचे आहे. ओव्हर कॉन्फिडन्समुळे अनेकांचा घात झाला आहे. त्यामुळे जोमाने काम करा. राज्यातील पाणी टंचाई परिस्थितीचा सामना करण्याबाबत जनतेला पुरेसे पाणी मिळावे यासाठी चर्चा झाली आहे. जेवढे खासदार आहेत त्यापेक्षा जास्त जागा शिवसेनेला मिळतील, आणि १०० टक्के स्ट्राइक रेट ठेवल्यास शिवसेना एनडीए मधील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असेल, असेही मत शिंदे यांनी व्यक्त केले. 

Web Title: 'Overconfidence kills many'; Eknath Shinde's big claim after cutting MP's ticket in Maharashtra Loksabha Shivsena Election 2024 politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.