खडकवासलातून राष्ट्रवादीच्या इच्छूकांना धडकी; भाजप सुसाट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 11:49 AM2019-07-12T11:49:14+5:302019-07-12T11:49:14+5:30

२०१९ लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना तब्बल ६५ हजाराचे मताधिक्य मिळाले. या व्यतिरिक्त कुल यांना पुरंदरमधून १६ हजार मतांची आघाडी मिळाली. ही आघाडी विधानसभेला भरून निघू शकते. परंतु, खडकवासला मतदार संघातील भाजपचे मताधिक्य कमी करण्याचे खडतर आव्हान राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर आहे.

NCP's wish to comeback in Khadkawasla in Vidhansabha election against BJP | खडकवासलातून राष्ट्रवादीच्या इच्छूकांना धडकी; भाजप सुसाट

खडकवासलातून राष्ट्रवादीच्या इच्छूकांना धडकी; भाजप सुसाट

Next

मुंबई - पुणे जिल्ह्यातील आणि लोकसभेला बारामती मतदार संघात येत असलेल्या खडकवासला विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या इच्छूकांना धडकी भरली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला खडकवासलामधून मिळालेले मताधिक्य सहाजिकच विद्यमान आमदार आणि भाजप इच्छूकांसाठी आनंद देणारे असले तरी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या पोटात गोळा आणणारेच आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुप्रिया सुळे यांच्यासाठी एकदिलाने काम करण्याची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञा केली होती. त्यानुसार सर्वांनी कामही केले. मात्र त्यांचे काम भाजपला आघाडी मिळविण्यापासून रोखू शकले नाही. खडकवासलामध्ये सुप्रिया सुळे यांची अखेरची सभा झाली होती. त्याचा देखील काहीच परिणाम झालेला दिसत नाही.

२०१४ लोकसभा निवडणुकीत महादेव जाणकर यांना देखील खडकवासलामधून २८ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. यावेळी या मताधिक्यात दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झाल्याच दिसून येते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पक्षांतर्गत असलेले वाद मिटविण्यासाठी नेत्यांवर डोळे वटारले होते. परंतु, त्याचा काहीही लाभ झाला नाही. यामुळे या मतदार संघातून पिछाडीवर गेल्याची बाब राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागणारीच आहे.

२०१९ लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना तब्बल ६५ हजारांचे मताधिक्य मिळाले. या व्यतिरिक्त कुल यांना पुरंदरमधून १६ हजार मतांची आघाडी मिळाली. ही आघाडी विधानसभेला भरून निघू शकते. परंतु, खडकवासला मतदार संघातील भाजपचे मताधिक्य कमी करण्याचे खडतर आव्हान राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर आहे. एकूणच लोकसभेतील मताधिक्यामुळे येथील राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या पोटात गोळा आला हे नक्की. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी खुद्द अजित पवार यांनाच पुन्हा लक्ष घालावे लागणार आहे.

Web Title: NCP's wish to comeback in Khadkawasla in Vidhansabha election against BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.