भाजप निवडणूक आयोगाला खिशात घेऊन फिरतंय का? बिनविरोध निवडीवरून नाना पटोलेंचा घणाघात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 17:05 IST2026-01-05T17:02:03+5:302026-01-05T17:05:38+5:30
Maharashtra Municipal Elections: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत बिनविरोध निवडीवरून मोठे राजकीय युद्ध पेटले.

भाजप निवडणूक आयोगाला खिशात घेऊन फिरतंय का? बिनविरोध निवडीवरून नाना पटोलेंचा घणाघात!
राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत बिनविरोध निवडीवरून मोठे राजकीय युद्ध पेटले. महायुतीचे तब्बल ६७ उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. भाजपने लोकशाहीची हत्या केली असून, निवडणूक आयोगाला ते खिशात घेऊन फिरत आहेत का?" असा संतप्त सवाल पटोले यांनी उपस्थित केला.
नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटले की, भाजपने उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी जो डाव खेळला आहे, तो अत्यंत खालच्या पातळीचा आहे. "पोलिसांचा दबाव वापरून आणि पैशांच्या मोठ्या ऑफर्स देऊन विरोधी उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जात आहे. असे प्रकार महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत याआधी कधीच घडले नव्हते," असे पटोले म्हणाले.
#WATCH | Nagpur, Maharashtra | Congress leader Nana Patole says, "BJP and Shiv Sena have poached our leaders ahead of the BMC elections, and this is a murder of democracy. Such behaviour and misuse of language have never been seen in Maharashtra. BJP and their allies cannot… pic.twitter.com/Mc2Vk8vWs6
— ANI (@ANI) January 5, 2026
निवडणूक आयोगाचा 'यू-टर्न' संशयास्पद
महायुतीचे ६७ उमेदवार बिनविरोध निवडून येण्याच्या प्रक्रियेवर नाना पटोले यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, "सुरुवातीला निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेत कारवाई करण्याचे संकेत दिले. मात्र, अचानक आयोगाने आपला निर्णय बदलला आणि यू-टर्न घेतला. निवडणूक आयोग दबावाखाली काम करत आहे का? असा प्रश्न आता सामान्य जनतेला पडला आहे."
लोकशाही धोक्यात!
भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना लोकशाही मान्य नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. "जेव्हा सत्तेचा वापर करून निवडणुका मॅनेज केल्या जातात, तेव्हा लोकशाही खऱ्या अर्थाने धोक्यात येते. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करावी," अशी विनंती नाना पटोले यांनी केली आहे.