Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : खरी शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंचा लागतोय कस, एकनाथ शिंदे ठरतायत सरस! असा आहे आतापर्यंतचा कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 11:27 IST2024-11-23T11:25:01+5:302024-11-23T11:27:04+5:30

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : शिवसेनेसंदर्भात आतापर्यंत एक प्रश्न संपूर्ण देशाला पडला होता, तो म्हणजे, खरी शिवसेना कुणाची? यावर आज शिक्कामोर्तब होणार आहे. आतापर्यंत आलेल्या कलांनुसार, जनतेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कल दिल्याचे दिसत आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची मोठी पिछेहाट होताना दिसत आहे. अर्थात आतापर्यंतच्या कलात उद्धव ठाकरे यांचा कस लागताना दिसत आहे. तर एकनाथ शिंदे सरस ठताना दिसत आहेत.

maharashtra vidhan sabha election 2024 results highlights Whose is the real Shiv Sena? How is Uddhav Thackeray doing, Eknath Shinde is the best! This is the trend so far | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : खरी शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंचा लागतोय कस, एकनाथ शिंदे ठरतायत सरस! असा आहे आतापर्यंतचा कल

Key Highlights of Maharashtra Vidhan Sabha Election 2024

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल येत आहे. मतमोजणी सुरू आहे. निकालाचे कल हाती येत आहेत. शिवसेनेसंदर्भात आतापर्यंत एक प्रश्न संपूर्ण देशाला पडला होता, तो म्हणजे, खरी शिवसेना कुणाची? यावर आज शिक्कामोर्तब होणार आहे. आतापर्यंत आलेल्या कलांनुसार, जनतेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कल दिल्याचे दिसत आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची मोठी पिछेहाट होताना दिसत आहे. अर्थात आतापर्यंतच्या कलात उद्धव ठाकरे यांचा कस लागताना दिसत आहे. तर एकनाथ शिंदे सरस ठताना दिसत आहेत.

आतापर्यंत अर्थात 11.15 वाजेपर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना 55 जागांवर आघाडीवर दिसत आहे. तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना केवळ 18 जागांवरच आघाडीवर दिसत आहे. महत्वाचे म्हणजे शिवसेना (एकनाथ शिंदे) महायुतीतील क्रमांक दोनचा मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. तर शिवसेना (उद्धव ठाकरे) महाविकास आघाडीतील सर्वात छोटो पक्ष ठरताना दिसत आहे.

बघा लाइव्ह ब्लॉग : 
Watch Live Blog >>

आतापर्यंत आलेले कल - 
आतापर्यंत आलेल्या कलांनुसार महायुती 288 पैकी 221 जागांवर आघाडीवर दिसत आहे. यात भाजप 131 जागांवर आघाडीवर असून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. याशिवाय, शिवसेना (एकनाथ शिंदे) 55 जागांवर आघाडीवर असून राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 35 जागावर आघाडीवर असून राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. तर, महाविकास आघाडी केवळ 55 जागांवर दम टाकताना दिसत आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस 20 जागांवर आघाडीवर असून मविआतील सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 17 तर शिवसेना (ठाकरे) 18 जागांसह आघाडीवर आहे. 

Web Title: maharashtra vidhan sabha election 2024 results highlights Whose is the real Shiv Sena? How is Uddhav Thackeray doing, Eknath Shinde is the best! This is the trend so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.