शपथेआधी एकनाथ शिंदेंनी दोन गुरूंना केलं वंदन; मोदी-शाहांसह १३ कोटी जनतेचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 18:05 IST2024-12-05T18:05:16+5:302024-12-05T18:05:56+5:30

Maharashtra CM Swearing Ceremony : आज देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Maharashtra CM Swearing Ceremony : Eknath Shinde paid obeisance to two Gurus | शपथेआधी एकनाथ शिंदेंनी दोन गुरूंना केलं वंदन; मोदी-शाहांसह १३ कोटी जनतेचे मानले आभार

शपथेआधी एकनाथ शिंदेंनी दोन गुरूंना केलं वंदन; मोदी-शाहांसह १३ कोटी जनतेचे मानले आभार

Maharashtra CM Swearing Ceremony :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आज अखेर नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्याचे मुख्यमंत्री आणि हजारो लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दरम्यान, यावेळी एकनाथ शिदेंनी आपल्या दोन गुरुंना वंदन करुन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 

राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शपथ घेण्यापूर्वी त्यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केले. तसेच, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह देशातील १३ कोटी जनतेचेही आभार मानले.

राज्याला मिळाले नवे मुख्यमंत्री
आजच्या शपथविधी सोहल्यात देवेंद्र फडणवीसांनी सर्वप्रथम मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीसांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला आहे. तसेच, फडणवीसांच्या रुपाने राज्याला 21वे मुख्यमंत्री मिळाले आहेत. 

दरम्यान, आजच्या या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री, 22 राज्यांचे मुख्यमंत्री, देशभरातील शेकडो दिग्गज व्यक्ती, साधू-महंत आणि ४० हजार नागरिकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा भव्य शपथविधी सोहळा आज पार पडला. 

महाराष्ट्राचा महायुतीला भक्कम पाठिंबा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते, तर 23 नोव्हेंबरला निकाल लागलाहोता. महायुतीने २८८ पैकी २३०+ जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. यामध्ये भाजप १३२+, शिवसेना शिंदेगट 58 आणि राष्ट्रवादी अजित पवार गाटाला ४१ जागा मिळाल्या. तर, महाविकास आघाडीला ५० चा आकडाही पार करता आला नाही. या निकालानंतर मुख्यमंत्री कोणा होणार, हा सर्वात मोठा प्रश्न राज्यापुढे होता. पण, आज अखेर महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळला आहे. 

Web Title: Maharashtra CM Swearing Ceremony : Eknath Shinde paid obeisance to two Gurus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.