महायुतीने साधले जातीय समीकरण; फडणवीसांच्या मंत्रिमंडळात प्रत्येक समाजाला प्रतिनिधीत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 16:31 IST2024-12-15T16:30:37+5:302024-12-15T16:31:07+5:30

Maharashtra Cabinet Expanssion : आज नागपुरात फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडत आहे.

Maharashtra Cabinet Expansion: Mahayuti achieves caste balance; Fadnavis' cabinet has representatives from every community | महायुतीने साधले जातीय समीकरण; फडणवीसांच्या मंत्रिमंडळात प्रत्येक समाजाला प्रतिनिधीत्व

महायुतीने साधले जातीय समीकरण; फडणवीसांच्या मंत्रिमंडळात प्रत्येक समाजाला प्रतिनिधीत्व

Maharashtra Cabinet Expanssion : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज(दि.15) होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज महायुतीचे 39 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यात भाजप 19, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 10 मंत्र्यांचा समावेश आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडत आहे. विशेष म्हणजे, मंत्रिमंडळ विस्तारात प्रत्येक समाजाची जाती-धर्माची काळजी घेण्यात आली आहे. 

भाजपच्या कोट्यातून 19 मंत्री

  1. चंद्रशेखर बावनकुळे- कामठी-विदर्भ-ओबीसी
  2. गिरीश महाजन- जामनेर- उत्तर महाराष्ट्र- ओबीसी
  3. चंद्रकांत पाटील- कोथरूड-पश्चिम महाराष्ट्र- मराठा 
  4. जयकुमार रावल-धुळे शहादा- राजपूत
  5. पंकजा मुंडे -MLC बीड-मराठवाडा- वंजारी समाज -ओबीसी
  6. पंकज भोयर- आरवी-विदर्भ- कुणबी मराठा
  7. राधाकृष्ण विखे पाटील- शिर्डी- पश्चिम महाराष्ट्र- मराठा
  8. मंगल प्रभात लोढा- मलबार हिल- मारवाडी
  9. शिवेंद्रराजे भोसले- सातारा- पश्चिम महाराष्ट्र-मराठा 
  10. मेघना बोर्डीकर- जिंतूर-मराठवाडा- मराठा
  11. नितेश राणे- कणकवली-कोकण - मराठा
  12. माधुरी मिसाळ - पुणे - पश्चिम महाराष्ट्र - ओबीसी
  13. गणेश नाईक- नवी मुंबई- ठाणे-ओबीसी
  14. आशिष शेलार- मराठा- मुंबई वांद्रे
  15. संजय सावकारे-भुसावळ-उत्तर महाराष्ट्र -SC
  16. आकाश फुंडकर-विदर्भ- कुणबी मराठा ओबीसी
  17. जयकुमार गोरे- मान खटाव- पश्चिम महाराष्ट्र माळी- ओबीसी
  18. अतुल सावे- औरंगाबाद पूर्व-मराठवाडा -ओबीसी माळी
  19. अशोक उईके-विदर्भ- आदिवासी

शिवसेनेचे 10 मंत्री

  1. संजय सिरसाट-औरंगाबाद पश्चिम मराठवाडा- अनुसूचित जाती
  2. उदय सामंत- रत्नागिरी-कोकण-कायस्थ ब्राह्मण
  3. शंभूराजे देसाई- पाटण - पश्चिम महाराष्ट्र- मराठा 
  4. गुलाबराव पाटील -उत्तर महाराष्ट्र गुर्जर-ओबीसी
  5. भरत गोगावले- महाड - कोकण - ओबीसी मराठा कुणबी
  6. संजय राठोड - डिग्रस-विदर्भ - ओबीसी बंजारा
  7. आशिष जैस्वाल- रामटेक -विदर्भ - ओबीसी बनिया
  8. प्रताप सरनाईक-ठाणे- माजिवडा - मराठा
  9. योगेश कदम-दापोली-कोकण - मराठा
  10. प्रकाश आबिटकर- राधानगरी-पश्चिम महाराष्ट्र- मराठा

राष्ट्रवादीचे 10 मंत्री 

  1. अदिती तटकरे-श्रीवर्धन-कोकण - ओबीसी
  2. नरहरी झिरवाळ- दिंडोरी-उत्तर महाराष्ट्र -आदिवासी समाज
  3. बाबासाहेब पाटील- अहमदपूर - मराठवाडा- मराठा
  4. हसन मुश्रीफ-कागल- पश्चिम महाराष्ट्र - मुस्लिम अल्पसंख्याक मुस्लिम चेहरा
  5. दत्ता भरणे - इंदापूर- पश्चिम महाराष्ट्र - धनगर समाज
  6. धनंजय मुंडे - परळी- मराठवाडा -वंजारी -ओबीसी
  7. अनिल पाटील- अमळनेर-उत्तर महाराष्ट्र - मराठा
  8. मकरंद पाटील - सातारा - पश्चिम महाराष्ट्र - मराठा
  9. माणिकराव कोकाटे-  सिन्नर-उत्तर महाराष्ट्र - मराठा
  10. इंद्रनील नाईक- पुसद- मराठा

महाराष्ट्राचा निकाल
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाला. महायुती 230+ जागा जिंकून सत्तेत आली. यामध्ये 132 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, तर शिंदे यांच्या शिवसेनेने 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या. विरोधकांच्या महाविकास आघाडीला फक्त 46 जागा जिंकता आल्या.

Web Title: Maharashtra Cabinet Expansion: Mahayuti achieves caste balance; Fadnavis' cabinet has representatives from every community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.