पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही राज्यात धडाका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 06:27 IST2024-11-02T06:26:40+5:302024-11-02T06:27:42+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : नाशिक पाठोपाठ पंतप्रधान मोदी यांची पुण्यातही सभा होणार आहे. १२ नोव्हेंबर रोजी पुण्यातील एस. पी. महाविद्यालयाच्या मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 

Maharashtra Assembly Election 2024 : Prime Minister Narendra Modi's rallys are also a blast in the state  | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही राज्यात धडाका 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही राज्यात धडाका 

Maharashtra Assembly Election 2024 :  नाशिक/पुणे/छत्रपती संभाजीनगर : महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचेही नियोजन करण्यात आले असून ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांची सभा नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे. पंचवटी येथील तपोवनात असलेल्या मोदी ग्राऊंडवर होणार आहे.  

नाशिक पाठोपाठ पंतप्रधान मोदी यांची पुण्यातही सभा होणार आहे. १२ नोव्हेंबर रोजी पुण्यातील एस. पी. महाविद्यालयाच्या मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.  जालना व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यासाठी पंतप्रधान मोदी यांची एकत्रित सभा १४ नोव्हेेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा एमआयडीसीतील ग्रॅहमफर्थच्या मोकळ्या जागेत होणार आहे.

विशेष म्हणजे याच दिवशी विरोधी महाविकास आघाडीतील उद्धवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणार आहे.  

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 : Prime Minister Narendra Modi's rallys are also a blast in the state