प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज्यात आराेप-प्रत्याराेपांच्या ताेफा; दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 06:34 AM2024-04-25T06:34:51+5:302024-04-25T06:35:26+5:30

गांधी, पवार, ठाकरेंकडून प्रभू श्रीरामांचा अपमान : शाह

Loksabha Election 2024 - On the last day of campaigning ,Accusations of the ruling opposition; Voting tomorrow for the second phase | प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज्यात आराेप-प्रत्याराेपांच्या ताेफा; दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज्यात आराेप-प्रत्याराेपांच्या ताेफा; दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान

प्रदीप भाकरे

अमरावती : काँग्रेसने राम मंदिर निर्माणाचा मुद्दा अनेक दशके तिष्ठत ठेवला. मात्र, मोदींनी अवघ्या काही काळात भूमिपूजन, मंदिर निर्माण व प्राणप्रतिष्ठा करून प्रलंबित मुद्याला ‘जय श्रीराम’ केले. मात्र, राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे निमंत्रण देऊनही प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास आले नाहीत. त्यांनी प्रभू श्रीरामांचा अपमान केल्याची घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे केली. महायुतीच्या अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बुधवारी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध नेते उपस्थित होते. 

दुसऱ्या टप्प्यात देशातील ८९ जागांसाठी उद्या मतदान

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रचाराच्या धुराळा बुधवारी शांत झाला. महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, नांदेड, हिंगोली आणि परभणी या आठ मतदारसंघांसह देशातील १३ राज्यांतील ८९ जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यातील २०४ उमेदवारांसह देशात एकूण १,१९८ उमेदवार रिंगणात आहे. या टप्प्यात केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर, हेमा मालिनी, अरुण गोविल, राहुल गांधी, शशी थरूर, एच.डी. कुमारस्वामी आदी प्रमुख नेते रिंगणात आहेत. 

Web Title: Loksabha Election 2024 - On the last day of campaigning ,Accusations of the ruling opposition; Voting tomorrow for the second phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.