‘सांगलीत जे झाले ते बरोबर झाले नाही’; परंपरागत जागा असल्याचा दावा करत नाना पटोले म्हणाले...  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 05:21 PM2024-03-26T17:21:34+5:302024-03-26T17:23:27+5:30

Lok Sabha Election 2024: शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि काँग्रेसमध्ये (Congress) सांगली लोकसभा मतदारसंघावरून तिढा निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोठं विधान केलं आहे.

Lok Sabha Election 2024: 'What happened in Sangli was not right'; Claiming to be a traditional place, Nana Patole said... | ‘सांगलीत जे झाले ते बरोबर झाले नाही’; परंपरागत जागा असल्याचा दावा करत नाना पटोले म्हणाले...  

‘सांगलीत जे झाले ते बरोबर झाले नाही’; परंपरागत जागा असल्याचा दावा करत नाना पटोले म्हणाले...  

नागपूर/मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यातच शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघावरून तिढा निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं विधान केलं आहे. सांगली व भिवंडी या काँग्रेसच्या परंपरागत जागा आहेत, या जागांवर  काँग्रेस पक्षाकडे चांगले उमेदवार आहेत. सांगलीत जे झाले ते बरोबर झाले नाही, असे नाना पटोले म्हणाले. 

याबाबत  नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दोन जागांवर अजून निर्णय झालेला नाही, त्यावर चर्चेतून लवकरच मार्ग निघेल. आघाडीचा धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे. सांगली व भिवंडी या काँग्रेसच्या परंपरागत जागा आहेत, या जागांवर  काँग्रेस पक्षाकडे चांगले उमेदवार आहेत. सांगलीत जे झाले ते बरोबर झाले नाही. असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रस्तावासाठी काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकले आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या मित्र पक्षांनीही तो प्रस्ताव मान्य करावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

नाना पटोले पुढे म्हणाले की, देशाचे संविधान व लोकशाही टिकवणे हे सर्वांचे काम आहे. आताची निवडणूक ही देश वाचवण्यासाठी आहे. भाजपाचा पराभव करणे हाच मुख्य उद्देश आहे. महाविकास आघाडी या लोकसभा  निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव करेल. मागील १० वर्षात भाजपाने खोटी आश्वासने देऊन देशाला बरबाद केले त्याचा उगम हा नागपुरच आहे. महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, शेतकऱ्याला उद्ध्वस्त केले आहे. देशावर कर्जाचा मोठा डोंगर करून ठेवला आहे. जनतेमध्ये मोदी सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे त्यामुळे मोदी सरकारला धडा शिकवल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही असे चित्र सगळीकडे आहे, असा दावाही नाना पटोले यांनी केला. 

Web Title: Lok Sabha Election 2024: 'What happened in Sangli was not right'; Claiming to be a traditional place, Nana Patole said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.