नितीन गडकरींविरोधात काँग्रेसने दिला तगडा उमेदवार, चौथी यादी प्रसिद्ध, महाराष्ट्रातून आणखी चार उमेदवारांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 11:11 PM2024-03-23T23:11:48+5:302024-03-23T23:13:18+5:30

Congress 4rth Candidate List: लोकसभा निवडणुकीसाठी (lok sabha election 2024) काँग्रेसची उमेदवारांची चौथी यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीमधून काँग्रेसचे एकूण ४६ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यात महाराष्ट्रातील चार मतदारसंघांचा समावेश आहे.

lok sabha election 2024: Congress has fielded a strong candidate Vikas Thakare against Nitin Gadkari, the fourth list has been released, four more candidates have been announced from Maharashtra | नितीन गडकरींविरोधात काँग्रेसने दिला तगडा उमेदवार, चौथी यादी प्रसिद्ध, महाराष्ट्रातून आणखी चार उमेदवारांची घोषणा

नितीन गडकरींविरोधात काँग्रेसने दिला तगडा उमेदवार, चौथी यादी प्रसिद्ध, महाराष्ट्रातून आणखी चार उमेदवारांची घोषणा

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवारांची चौथी यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीमधून काँग्रेसचे एकूण ४६ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यात महाराष्ट्रातील चार मतदारसंघांचा समावेश असून, पहिल्या टप्पात मतदान होणाऱ्या नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसने आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. 

आज काँग्रेसने महाराष्ट्रामधील नागपूर, गडचिरोली-चिमूर, रामटेक आणि भंडारा-गोंदिया या मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामध्ये नागपूरमधून आमदार विकास ठाकरे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून काँग्रेसने डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली आहे.  तर भंडारा-गोंदिया मतदारसंघातून डॉ. प्रशांत पाडोले यांना तर रामटेकमधून रश्मी बर्वे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

तत्पूर्वी काँग्रेसने महाष्ट्रातील सात उमेदवारांची घोषणा केली होती. त्यात  काँग्रेसने नंदूरबारमधून जी. के. पाडवी, अमरावतीमधून बळवंत वानखेडे, नांदेडमधून वसंतराव चव्हाण, पुण्यामधून रवींद्र धंगेकर, लातूरमधून शिवाजीराव काळगे, सोलापूरमधून प्रणिती शिंदे आणि कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केली होती. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून अद्याप तोडगा निघालेला नाही. तसेच वंचितबाबतही मविआमध्ये एकमत होऊ शकलेले नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसने आपल्या वाट्याला येणाऱ्या जागांवरील उमेदवार निश्चित करून आघाडी घेतली आहे.  

Web Title: lok sabha election 2024: Congress has fielded a strong candidate Vikas Thakare against Nitin Gadkari, the fourth list has been released, four more candidates have been announced from Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.